शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

‘त्या’ बहिणींच्या मदतीसाठी अनेकांचे सरसावले हात

By admin | Updated: August 2, 2016 15:36 IST

आई-वडिलांच्या निधनानंतर पोरक्या झालेल्या बहिणी परिस्थितीशी दोनहात करीत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांनी मदतीचा हात पुढे केला.

ऑनलाइन लोकमत

उस्मानाबाद, दि. २ -  आई-वडिलांच्या निधनानंतर पोरक्या झालेल्या गोवर्धनवाडी येथील बहिणी परिस्थितीशी दोनहात करीत शिक्षण घेत आहेत. ‘निराधार दोघी बनल्या एकमेकींचा आधार’ या शिर्षकाखाली याबाबतचे वृत्त ‘आॅनलाईन लोकमत’ वर २६ जुलै रोजी प्रसिध्द झाले. त्यानंतर राज्यभरातून अनेकांनी मदतीसाठी हात पुढे केला आहे. आई-वडिलांचे छत्र हरवल्यानंतर निकिता आणि पूजा या बहिणींचा सांभाळ त्यांचे नातेवाईक करीत होते. मात्र, नातेवाईकांची परिस्थितीही हालाखीची असल्याने आपण किती दिवस त्यांच्यावर अवलंबून रहायचे, आपले आपण कष्ट करून राहू, असे म्हणत या दोघी बहिणी गोवर्धनवाडी येथे रहायला आल्या. दहावीत असलेली मोठी निकिता आठवड्यातील काही दिवस शाळेत जाते तर उर्वरित दिवशी मजुरी करून छोट्या बहिणीसह आपला शिक्षण आणि घरखर्च भागवत आहे. लहान बहीण पूजा इयत्ता आठवीत आहे. पूजाला कुठेही कामाला न पाठविता निकिताने घरातील कर्त्याची जबाबदारी स्वत: खंबीरपणे पेलली आहे. या जीवनाशी खंबीरपणे लढा देणाऱ्या बहिणींना समाजानेही साथ द्यायला हवी, अशा पध्दतीचे आवाहन ‘लोकमत’ने केले होते. ‘लोकमत’मधील सदर वृत्त वाचल्यानंतर आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी गोवर्धनवाडी येथे जावून या बहिणींची भेट घेतली तसेच विचारपूस केली. दोघींच्या नावाने बँकेमध्ये एक लाखाची एफडी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. याबरोबरच केवळ या दोन बहिणींपुरताच हा विषय नाही; तर जिल्ह्यात अठरा वर्षाखालील अशी निराधार अनाथ मुले असल्यास त्यांनाही शासकीय योजनांच्या माध्यमातून मदतीसाठी पाटील यांनी पुढाकार घेतला. अनाथ, निराधार असलेल्या व उत्पन्न निकषात बसते, अशा अठरा वर्षाखालील मुलांना तातडीने पिवळे रेशन कार्ड देण्याचे आदेश आ. पाटील यांनी दिले. याबरोबरच संजय गांधी निराधार योजनेत त्यांची नावे समाविष्ट करून अनुदान सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, ढोकी येथील एकता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गौस मोमीन तसेच तुळजाभवानी पेट्रोल पंपाचे हणमंत घोडके यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. उस्मानाबाद येथील भाई उध्दवराव पाटील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा रविवारी उस्मानाबाद येथे पार पडली. दोघी बहिणींना मदतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन आ. विक्रम काळे यांनी या सभेत केले. यावर संस्थेच्या ४१० सभासदांकडून ४१ हजार रुपये जमा होणार आहेत. त्यामध्ये स्वत: आ. विक्रम काळे ४१ हजार रुपये घालणार असून, अशी ८२ हजार रुपयांची मदत निकिताला देण्याचा निर्णय घेण्यात आला. या सभेत रोख पाच हजार रुपयांची प्राथमिक मदतही देण्यात आली. तेरणा प्रशालेकडून दरमहा चार हजारनिकिता तसेच पूजाला मदत करण्यासाठी ढोकी येथील तेरणा प्रशालेचे मुख्याध्यापक वसंत भोरे यांनीही शिक्षकांची बैठक घेतली. शाळेत शिक्षक व कर्मचारी असे मिळून ३७ जण कार्यरत आहेत. या सर्वांनी महिन्याला वर्गणी करून निकिताला दरमहा चार हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. यासाठी शाळेच्या वतीने तिचे बँक खातेही काढण्यात आले असून, जुलै महिन्याची मदत म्हणून चार हजारांची रक्कम तिच्या खात्यावर जमा करण्यात आली.जळगावातूनही मदतीसाठी हातसोमवारी जळगाव येथील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या संजय साळुंके यांनी या दोन्ही मुलींच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी घेण्याची इच्छा बोलून दाखविली. याबरोबरच ढोकी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर मानभाव यांनीही दर महिन्याला पाचशे रुपये शिष्यवृत्ती देणार असल्याचे सांगत एक वर्षाचे सहा हजार रुपये निकिताच्या खात्यावर जमाही केले. दोन्ही बहिणींचे लग्न होईपर्यंत ही मदत देणार असल्याचे ते म्हणाले. ढोकी येथीलच कैै. किसन समुद्रे युवा प्रतिष्ठाननेही या बहिणींच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. निकिताचे शिक्षण चालू असेपर्यंत प्रतिष्ठानतर्फे दरमहा पाचशे रुपये शिष्यवृत्ती देणार असल्याचे पंचायत समिती सदस्य अमोल समुद्रे यांनी सांगितले. दरम्यान, वंदना भारत गॅस एजन्सीचे ज्योतीबा धाकपाडे हे या बहिणींना स्वयंपाकासाठी गॅस कनेक्शन देणार आहेत. तर ढोकी येथील संग्राम देशमुख यांनीही या बहिणींना आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले.