शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

राज्यातील मद्य नियंत्रणासाठी मुख्यमंत्र्यांवर पत्रांचा वर्षाव करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2020 7:41 PM

राज्य शासनाने दारुचे दुकाने उघडण्यास दिलेली परवानगी म्हणजे विनाशकाले विपरीत बुध्दी

ठळक मुद्देपुणे, मुंबई शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तळीरामांची तळी उचलणाऱ्या शासनाच्या सदर कृतीस प्रखर विरोध करणे आवश्यक

पुणे: कोरोना विषाणू संसर्गसारखी भयानक परिस्थिती येऊन ठेपल्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आले असून महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्हयांपैकी ३४  जिल्हे कोरोनाग्रस्त झाल्याची परिस्थिती ओढवली आहे. पुणे, मुंबई शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून प्रादुर्भाव वाढत चालला असल्याचे दिसून येते. यादरम्यानचे काळात राज्य शासनाने दारुचे दुकाने उघडण्यास दिलेली परवानगी म्हणजे विनाशकाले विपरीत बुध्दी आहे. त्यामुळे नागरिकांनी संवेदनशील मुख्यमंत्र्यांच्या हृदयाला पाझर फुटावा या आशेने आणि मद्य नियंत्रणासाठी मुख्यमंत्र्यांचे ईमेल आयडीवर पत्रांचा वर्षाव करुन सदर निर्णय बदलण्यासाठी त्यांना भाग पाडावे. असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे श्रीकांत जोशी यांनी पत्रकाद्वारे केले आहे. 

जोशी यांनी सांगितले, टाळेबंदीच्या काळात तळीरामांची तळी उचलणाऱ्या शासनाच्या सदर कृतीस प्रखर विरोध करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी महाराष्ट्र शासना विरोधात लेखणी युध्द सुरु करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी यापुढे त्यांना महाराष्ट्र राज्याचे पद भूषवायचे का मद्यराष्ट्राचे याचा त्वरित खुलासा करणे अपेक्षित आहे.cmo@maharashtra.gov.in या ईमेल आयडीवर नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आपला विरोध दर्शववा आणि सरकारला निर्णय मागे घेण्यास भाग पाडावे.

* वृत्तपत्र वितरणाचा विचार का होत नाही ? 

कोरोनासारख्या महामारीचा समर्थपणे मुकाबला करीत गेला दीड महिना सर्वसामान्य जनतेने प्रशासनास व पोलीस खात्यास उत्तम सहकार्य केलेले आहे. १८ मे पर्यंत सर्वसामान्य जनता असेच सहकार्य निश्चितच करेल. तरीही प्रशासनाने लॉक डाऊन ची मुदत संपण्यापूर्वीच घाईघाईत दारूची दुकाने खुली करून सामान्य जनतेच्या भावना पायदळी तुडवल्या आहेत. तसेच २४ तास अहोरात्र जिवाचे रान करणारे डॉक्टर व परिचारिका आणि संपूर्ण पोलीस खाते आणि सफाई कर्मचारी या सर्वांचे मानसिक खच्चीकरण केलेले आहे. वृत्तपत्र घरपोच मिळावे अशी १०० % सर्वसामान्य जनतेची मागणी आहे आणि त्यात कोणताही धोका नाही तरी त्याचा विचार होत नाही तर त्यावर बंदी,या उलट 

दारूची दुकाने उघडण्यास १०० % सर्वसामान्य जनतेचा विरोध,आणि आताच्या परिस्थितीत तर अत्यंत धोकादायक असूनही दारूची दुकाने उघडण्यास मान्यता दिली जाते कारण खरा महसूल बुडतोय तो राजकिय नेत्यांचा. व्यक्तीचे आरोग्य, कौटुंबिक स्वास्थ्य आणि सामाजिक परिस्थिती यापेक्षा दारुतून मिळणारा महसूल सरकारला जास्त महत्वाचा वाटतो आहे. हे सर्वसामान्य जनतेचे दुर्देव. -विलास लेले (अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय अध्यक्ष )

टॅग्स :PuneपुणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेliquor banदारूबंदीState Governmentराज्य सरकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस