मनोरमाला अंतरिम जामीन मिळालेला, पण दिलीप खेडकरचा जामीन फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 09:12 IST2025-10-09T09:12:07+5:302025-10-09T09:12:37+5:30
Dilip Khedkar news: ऐरोली येथे झालेल्या अपघातात कारची नुकसानभरपाई मागण्यासाठी ट्रक क्लीनरचे अपहरण केल्याची घटना घडली होती.

मनोरमाला अंतरिम जामीन मिळालेला, पण दिलीप खेडकरचा जामीन फेटाळला
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : अपहरण प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या दिलीप खेडकर यांचा जामीन अर्ज बेलापूर न्यायालयाने फेटाळला आहे. या गुन्ह्यात बाउन्सर प्रफुल्ल साळुंखे हा अटकेत असून, दिलीप खेडकर यांचा शोध रबाळे पोलिसांची विविध पथके घेत आहेत.
ऐरोली येथे झालेल्या अपघातात कारची नुकसानभरपाई मागण्यासाठी ट्रक क्लीनरचे अपहरण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर, बाउन्सर प्रफुल्ल साळुंखे यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल असून, त्यांना सहकार्य केल्याप्रकरणी मनोरम खेडकर यांना त्यात सहआरोपी करण्यात आले आहे.
पोलिस त्यांच्या अटकेसाठी प्रयत्न करत असतानाच मनोरमा खेडकर यांना बेलापूर न्यायालयाने १३ ऑक्टोबरपर्यंत अंतरिम जामीन दिला. यानंतर वकिलामार्फत दिलीप खेडकर यांच्या जामिनासाठी बेलापूर न्यायालयात अर्ज करण्यात आला. मात्र, त्यांना जामीन मिळू नये, यासाठी पोलिसांनी गुन्ह्याची गंभीरता सोमवारी न्यायालयापुढे मांडली होती. या प्रकरणी बुधवारी सुनावणीत न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला.