मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 19:05 IST2025-09-08T19:04:38+5:302025-09-08T19:05:45+5:30
Manoj Jarange: मराठा आंदोलक मनोज जरांगे हे गेल्या आठवड्यात मुंबईत उपोषण करून मराठा आरक्षणाचा जीआरसह सहा मागण्या पूर्ण करून आले आहेत. परंतू, तरीही मराठा आरक्षणाबद्दल लोकांमध्ये संभ्रमच असल्याचे दिसत आहे.

मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
मराठा आंदोलक मनोज जरांगे हे गेल्या आठवड्यात मुंबईत उपोषण करून मराठा आरक्षणाचा जीआरसह सहा मागण्या पूर्ण करून आले आहेत. परंतू, तरीही मराठा आरक्षणाबद्दल लोकांमध्ये संभ्रमच असल्याचे दिसत आहे. यावर जरांगे यांनी जर आम्हाला आरक्षण दिले नाही तर आम्ही मुंबईकरांचा भाजीपाला, दूध बंद करू अशी धमकी दिली आहे. तसेच हे बंद झाले की मुंबईकर काय वाळू खाणार का, असाही सवाल विचारला आहे.
आता उपोषण करणार नाही, रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे. जरांगे पाटील हे बीडच्या नारायण गडावर आले होते. तेव्हा त्यांचे स्वागत करण्यात आले. तिथे उपस्थित मराठा समाजाला जरांगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी दसरा मेळावा घेणार असल्याचे जाहीर केले.
सरकारने निर्णयाची अंमलबजावणी न केल्यास दसरा मेळाव्यातून पुन्हा इशारा देणार असल्याचे जरांगे म्हणाले. नारायण गडावर आपल्या दसरा मेळाव्याच्या तयारीला लागा असे ते मराठा समाजाला म्हणाले. जीआरचा फायदा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला होणार आहे. जर काही चुकले तर सुधारित जीआर काढाला लागेल, हे आम्ही स्पष्ट करून घेतले आहे, असे जरांगे म्हणाले.