शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 14:09 IST

Manoj Jarange Patil News: मराठ्यांच्या नादीच लागायचे नाही. यापुढे मराठ्यांवर अन्याय केला, तर तुमचे कार्यक्रम झालाच असे समजायचे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

Manoj Jarange Patil News: मराठा आरक्षणासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी सक्रिय होऊन आमच्या लढ्याला पाठिंबा द्यावा, अन्यथा समाजच त्यांना त्यांचे उत्तर देईल. मराठा समाजावर गेली सात पिढ्या अन्याय झाला आहे. गरीब मराठा समाजाची मुले शिकली पाहिजेत, त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून नोकरी, प्रतिष्ठा मिळावी यासाठी आरक्षणाचा लढा सुरू असून, तो अंतिम टप्प्यात पोहचला आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. ते पत्रकारांशी बोलत होते.

धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगला अद्याप सोडलेला नाही, त्यांना मंत्रिमंडळात घेण्याच्या हालचाली सुरू असल्याबाबत पत्रकारांनी मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना, ते स्वप्नातही आणू नका. मंत्रि‍पदाचे सोपे नाही. अजितदादांचा पूर्ण पक्षच संपेल. इतके क्रूर हत्या घडवून आणणारे, इतके गुंड सांभाळणारे, पुन्हा मंत्री केले, तर पक्ष संपेल ना. ते बंगल्यात राहिले काय आणि नाही काय, मला देणेघेणे नाही. यापुढे सांगतो की, कितीही मंत्री होऊ दे, आमचे ते दुःख नाही. ज्याच्यावर अन्याय झाला, त्याला न्याय देणे काम आहे. तुम्ही दोन काय चार मंत्री व्हा. आम्हाला फरक पडत नाही. तो त्यांचा प्रश्न आहे. काही करा. अन्याय केला की वाजवणार. सोडणारच नाही. मी आहे तोवर तरी नाही. मराठ्यांच्या नादीच लागायचे नाही. बाकीच्यांवर अन्याय तुम्ही करतच आहात. पण यापुढे मराठ्यांवर अन्याय केला, तर तुमचे कार्यक्रम झालाच असे समजायचे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

बीडमध्ये गुन्हेगारी वाढण्यास तेथील राजकीय शक्तीच कारणीभूत

बीडमध्ये गुन्हेगारी वाढण्यास तेथील राजकीय शक्तीच कारणीभूत असून, प्रशासनही तितकेच यामध्ये गुंतले आहे. अजितदादांकडे बीडचे पालकमंत्रिपद आहे, तरीही गुन्हेगारी थांबण्याऐवजी सुरूच आहे. यामुळे प्रशासनावर वचक नाही, हे सिद्ध होते, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. बीडचे पालकत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असले तरी जोपर्यंत परळी तालुक्यातील सर्व शासकीय कर्मचारी बदलले जात नाही तोपर्यंत गुन्हेगारी प्रवृत्ती थांबवता येणार नाही, असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मुंबईत २९ ऑगस्ट रोजी होणारे आंदोलन म्हणजे आरपार आणि अटीतटीची अंतिम लढाई असणार आहे. या आंदोलनात लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल होणार आहेत. माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत मराठा आरक्षणासाठी लढणार आहे, अशी माहिती मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिली.

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारMaratha Reservationमराठा आरक्षण