जरांगे चक्क CM फडणवीसांच्या बाजूने बोलले; म्हणाले, “काही लोक अडचणीत आणतात, पण आमचा विश्वास”
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 14:48 IST2025-10-17T14:46:27+5:302025-10-17T14:48:19+5:30
Manoj Jarange Patil News: बीडमधील मोर्चा हा ओबीसींचा नसून, ठराविक जातींचा आहे. फडणवीसांच्या लक्षात आले पाहिजे की, हा मोठा गेम असू शकतो, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

जरांगे चक्क CM फडणवीसांच्या बाजूने बोलले; म्हणाले, “काही लोक अडचणीत आणतात, पण आमचा विश्वास”
Manoj Jarange Patil News: बीडमधील मोर्चा हा ओबीसींचा मोर्चा नसून, ठराविक जातींचा मोर्चा आहे. फडणवीसांच्या लक्षात आले पाहिजे की, हा मोठा गेम असू शकतो. फडणवीसांची इमेज डॅमेज करायचा प्रयत्न आहे. सरकारमध्ये यांचेच लोक, मोर्चे काढणारे अजित पवारांचे लोक आहेत, हे यांना कळत नाही का? मात्र, फडणवीसांवर शंका येते की, मुंबईतल्या आंदोलनाच्या गाड्यांना आता नोटीस आल्या आहेत. मात्र, गोड बोलून वार करू नये. पण सध्या तर फडणवीसांबद्दल असे वाटत नाही, असे मराठा आरक्षण मिळण्यासाठीच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना जितके अडचणीत आणता येईल, तितके प्रयत्न या लोकांचे सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस यांना कसा फटका बसेल, याचे काम ते करत आहेत आणि त्यासाठी बीडचा मोर्चा आहे. आम्हाला वाटते देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील मराठा समाजाची मने जिंकली आहेत. सध्या तरी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आम्हाला शंका नाही. आम्हाला पक्के माहिती आहे की, त्यांनी गोरगरीब मराठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे ठरवले आहे. देवेंद्र फडणीस यांना गोरगरीब मराठ्यांचा आयुष्य उद्देश करण्याची इच्छा नसावी, असे आम्हाला वाटते आणि म्हणून त्यांनी जीआर काढला आहे आणि तोही हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन काढला आहे, असे जरांगे म्हणाले.
हा राष्ट्रवादी पुरस्कृत मोर्चा दिसत आहे
बीड मध्ये निघणार मोर्चा ओबीसींचा नाही. काही विशिष्ट जातीचे लोक उपस्थित राहणार आहेत. कारण ओबीसींच्या लक्षात आले आहे की, हा मोर्चा आपल्या फायद्याचा नाही. हा राष्ट्रवादी पुरस्कृत मोर्चा दिसत आहे. कारण त्या मोर्चात सर्व अजित दादांचे लोक त्यामध्ये दिसतात. सरकारने जीआर काढला, सरकारमधील लोक त्या विरोधात जातात आणि याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांनी समजून घ्यायला पाहिजे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, हैदराबाद गॅजेट सांगत असेल की, मराठा हा कुणबी आहे, तर ते गेले कुठे ते तरी आम्हाला दाखवावे. आम्हाला कळेल आणि मराठ्यांच्या लक्षात येईल की, कोणता नेता व्यासपीठावर गेला आहे, कोणत्या गावाचे कोण गेलेत. ओबीसींना आरक्षण मिळू नाही, म्हणून मराठा समाज मोर्चात गेला नव्हता. मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून हा बीडच्या मोर्चामध्ये सहभागी झाला, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.