“वाल्मीक कराडची पूर्ण संपत्ती ही धनंजय मुंडेंचीच”; मनोज जरांगे पाटलांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 11:25 IST2025-03-06T11:22:54+5:302025-03-06T11:25:54+5:30
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, धनंजय मुंडे यांना आमदारकीपासूनही हटवले पाहिजे. मुंडे मंत्री असताना कराड हाच त्यांची संपूर्ण कामे पाहत होता.

“वाल्मीक कराडची पूर्ण संपत्ती ही धनंजय मुंडेंचीच”; मनोज जरांगे पाटलांचा मोठा दावा
लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्याकडे असलेली संपत्ती ही त्याची नसून माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांची असल्याचा दावा मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला.
जरांगे पाटील म्हणाले, धनंजय मुंडे यांना आमदारकीपासूनही हटवले पाहिजे. मुंडे मंत्री असताना कराड हाच त्यांची संपूर्ण कामे पाहत होता.