रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 18:20 IST2025-12-31T18:19:32+5:302025-12-31T18:20:33+5:30
Manikrao Kokate News: सदनिका घोटाळ्या प्रकरणी झालेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी आज रुग्णालयातून बाहेर येत जामिनासाठी न्यायालयात हजेरी लावली.

रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
सदनिका घोटाळ्या प्रकरणी झालेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी आज रुग्णालयातून बाहेर येत जामिनासाठी न्यायालयात हजेरी लावली. यावेळी त्यांना शिक्षा आणि मंत्रिपदाबाबत विचारले असता, 'काय बोलायचं ते माझ्या वकिलांशी बोला' असे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.
१९९५ साली झालेल्या सदनिका घोटाळ्याप्रकरणी नाशिकमधील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी फेब्रवारीत महिन्यात माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंना दोषी ठरवत दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर डिसेंबर महिन्यात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली होती.
नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाच्या या निर्णयानंतर पोलिसांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र कोकाटे हे प्रकृती अस्वस्थ्यामुळे उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाले होते. तसेच त्यांनी शिक्षेपासून दिलासा मिळावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करत कोकाटे यांना झालेल्या शिक्षेला स्थगिती दिली होती.
सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर जामिन अर्जावर सही करण्यासाठी माणिकराव कोकाटे आज रुग्णालयामधून थेट न्यायालयात दाखल झाले होते. तिथे या सर्व घटनाक्रमाबाबत विचारले असता. 'काय बोलायचं ते माझ्या वकिलांशी बोला. मला आराम करू द्या. मला काही नको आहे', अशी प्रतिक्रिया दिली.