महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विधानमंडळात मोबाईलवर रमी खेळतानाचा एक व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये कृषिमंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर रमी खेळताना दिसत आहेत. या व्हिडिओनंतर, कोकाटेंवर चौफेर टीका होताना दिसत आहे. यातच आता एका भाजप आमदाराने कोकाटे यांचा बचाव केला आहे. "माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा तो कथित व्हिडिओ एआयच्या माध्यमाने तयार झालेला फेक व्हिडिओ असल्याचे भारचपचे विधान परिषद सदस्य परिणय फुके यांनी म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले फुके? -परिणय फुके म्हणाले, "मला असे वाटते की तो फेक व्हिडिओ आहे. माणिकराव कोकाटे जेथे बसतात, त्या मागेच मी बसतो. मी माणिकराव कोकाटेंना कधीही असं काही गेम वैगेरे खेळताना बघितलं नाही. आम्हीही आमचे मोबाईल बघतो. आम्हाला काही माहिती हवी असेल, तर आम्ही गुगल अथवा चॅट जिपीटीच्या माध्यमाने ती घेत असतो आणि मला वाटते तेही तीच घेत होते."
एआयच्या माध्यमाने तयार झालेला फेक व्हिडिओ -फुके पुढे म्हणाले, 'त्या' प्रकारचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करून, काही तरी एआयच्या माध्यमाने त्यांच्या फोनमध्ये तो 'जंगली रमी' टाकून, त्यांना (कोकाटे यांना) बदनाम करण्याचे काम रोहित पवार यांच्या माध्यमाने होत आहे. हा एआयच्या माध्यमाने तयार झालेला फेक व्हिडिओ आहे.
कोकाटे यांच्या स्पष्टिकरणाच्या दोन थेरी -तत्पूर्वी, या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देताना माणिकराव कोकाटे यांनीही दोन थेरी मांडल्या आहेत. पहिल्या थेरीत ते म्हणाले, "वरच्या हाऊसला बिझनेस असल्यामुळे मी वर बसलो होतो आणि हाऊस अडजर्न झालं असावं म्हणून खालच्या हाऊसला काय बिझनेस चालू आहे हे पाहण्यासाठी मी मोबाईल ओपन केला होता. मोबाईल ओपन केल्यानंतर युट्यूबवर येत असतान, अशा प्रकारच्या अनेक जाहीराती या ठिकाणी येतात. आता त्या जाहिराती स्किप कराव्या लागतात. त्या मी स्किप करत होतो. ती जाहीरात स्कीप करण्यासाठी मला दोन-तीन सेकंद लागले. त्यांनी १८ च सेकंदांचा दाखवला आहे. त्यांनी आणखी पुढे दाखवला असता, तर, स्किप केलेलं त्यांनी दाखवलं असतं ना, पण त्यांना ते दाखवायचं नाही आणि ते विरोधी पक्षनेते दाखवणारच नाही."
याशिवाय, दुसऱ्या थेरीत ते म्हणाले, "मी रमी खेळतच नव्हतो पहिली गोष्ट. मी खालच्या हाऊसमध्ये काय चाललं आहे? ते पाहण्यासाठी YouTube ऑन करायचे म्हणून फोन ऑन केला होता. परंतु त्याच्यावरती कुणीतरी गेम डाउनलोड केला होत. तो गेम मी स्किप करत होतो. स्किप करत असताना तेवढ्या वेळा तो व्हिडिओ आला असेल."