ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 09:44 IST2025-06-20T09:42:48+5:302025-06-20T09:44:01+5:30

नवी मुंबईत चार ठिकाणी खारफुटी उद्यान उभारण्याच्या प्रकल्पांची सुरुवात झाली आहे.

Mangrove gardens to be built in Airoli, Ghansoli; Forest Department appoints architects | ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती

ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबईत चार ठिकाणी खारफुटी उद्यान उभारण्याच्या प्रकल्पांची सुरुवात झाली आहे. वनविभागाने ऐरोली आणि घणसोली येथे या सुविधा उभारणीसाठी वास्तुविशारदांची नियुक्ती केली आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी यासाठी विशेष  पुढाकार  घेतला होता.

वनविभागाने मुंबईस्थित कोबोल आर्किटेक्ट्स अँड प्लॅनर्सना दोन्ही नोड्सवरील खारफुटी उद्यानांसाठी संकल्पनात्मक आणि तपशीलवार वास्तुशिल्पीय डिझाइनसाठी २० लाख रुपये सल्लागार शुल्कासह कामाचे आदेश दिले आहेत. त्यांना दिलेल्या कामाच्या व्याप्तीमध्ये तज्ज्ञांच्या समन्वयाने साइट विश्लेषण आणि पर्यावरणीय मूल्यांकन, अभ्यागत सुविधांचे डिझाइन, मार्ग, डेक आणि साइनेज यांचा समावेश आहे.

शहरातील सागरी जैवविविधतेचे संवर्धन 
हा प्रकल्प लोकांना खारफुटींचे महत्त्व आणि शहराच्या सागरी जैवविविधतेचे संवर्धन करण्यात त्यांची भूमिका याबद्दल शिक्षित करण्यासाठी आवश्यक असल्याचे म्हटले आहे, असे शहरातील खारफुटी उद्यानांसाठी काम करणाऱ्या नॅटकनेक्टचे संचालक बी.एन. कुमार यांनी म्हटले. त्यांनी ऑगस्ट २०२० मध्ये तत्कालीन कोकण आयुक्त आणि खारफुटी समितीचे अध्यक्ष जगदीश पाटील यांच्याकडे इको-टुरिझम प्रकल्प म्हणून प्रस्ताव मांडला होता.

खारफुटीवरील बेकायदेशीर झोपड्या हटवल्या
आम्ही अलीकडेच वनमंत्री गणेश नाईक यांना वाशी रेल्वे स्थानकाजवळ समुद्रातील वनस्पती पुनर्संचयित ठिकाणी खारफुटी पदपथ उभारण्याचा प्रस्ताव सुचविला असल्याचे कुमार यांनी सांगितले. नाईक यांनी या कल्पनेचे कौतुक केल्यानंतर मँग्रोव्ह सेलने अलीकडेच येथील खारफुटीवर वाढलेल्या सर्व बेकायदेशीर झोपड्या हटविल्या आहेत. वाशीचे ठिकाण हे रेल्वे स्टेशन, बस डेपो आणि पार्किंग लॉटजवळ असल्याने लॉजिस्टिकदृष्ट्या सोयीस्कर आहे.

Web Title: Mangrove gardens to be built in Airoli, Ghansoli; Forest Department appoints architects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.