शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

कौटुंबिक वादातून जावयाने केली सासरा, पत्नी व मेव्हण्याची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 9:45 AM

बाळापूरातील आझादनगर भागात जावयाने सासरा, पत्नी आणि मेव्हण्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

बाळापूर - पत्नीला नांदायला पाठवत नसल्याचा रागातून संतापलेल्या जावयाने सासरा,मेव्हण्यासह पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उशिरा रात्री अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात घडली. गेल्या काही दिवसापासून पत्नी माहेरी होती.तिला तिचे आई-वडील व भाऊ पतीसोबत नांदायला पाठवत नाही या कारणावरून पतीने सासरा,मेव्हणा व पत्नीला चाकुने भोसकून ठार केले. याप्रकरणी बाळापुर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

आरोपी सै.फिरोज से रज्जाक हा बार्शिटाकळी तालुक्यातील एरंडा-पारंडा येथील रहिवाशी असून तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याची पत्नी त्याच्याकडे राहत नव्हती.तिचे आई-वडील देखील तिला सासरी पाठवत नव्हते.अनेक दिवसांपासून पत्नी माहेरी असल्याने आरोपी बाळापूरात येऊन वाद घालत होता.हाच राग अनावर होत आरोपी जावयाने शेख महेबुब(वय-65,सासरा),महंमद फिरोज (वय-27,मेव्हना),शबाना परविन(वय-30,पत्नी)हिला ठार मारले,अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे.

आरोपीला दोन मुली आहेत (एक सात वर्षांची तर दुसरी पाच वर्षांची) दोन्ही मुली आरोपीकडे राहत होत्या. बुधवारी संध्याकाळी तो मुलींना घेऊन सासरी आला होता .यावेळी त्याने सोबत चाकू व पेट्रोल आणले होते. त्याच्यासोबत पत्नीला पाठवत नसल्याचे सासरच्यांनी सांगितल्यानंतर त्याने सासरा,पत्नी व मेव्हण्यावर चाकूने सपासप वार केले. त्यात तिघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती बाळापुर पोलिसांना मिळाल्यानंतर ठाणेदार विनोद ठाकरे त्यांच्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले.यावेळी आरोपी घटनास्थळीच बसून होता.आपण पोलिसांचीच वाट पाहत आहोत,असेही त्याने सांगितले.याप्रकरणी बाळापूर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.