शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
3
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
4
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
5
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
6
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
7
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
8
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
9
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
10
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
12
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
13
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
14
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
15
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
16
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
17
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
18
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
19
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
20
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले

'त्या' कथित ऑडिओ क्लिपमधील मल्लिकार्जुन पुजारींचा जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 12:31 IST

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावरील व्हायरल क्लिप ट्विट करून जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला होता. आता या प्रकरणातील मल्लिकार्जुन पुजारी यांनी समोर येऊन मोठा दावा केला आहे. 

मुंबई - बदलापूर बलात्कार प्रकरणानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. त्यातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नावानं कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यात ते एका पीडितेला तिला मरायचं असेल तर मरू दे, तू मध्ये पडू नकोस असं ते एका कार्यकर्त्याला सांगताना दिसतात. ती क्लिप सोशल मीडियात फिरत असताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या ट्विटवरून ऑडिओ पोस्ट करत आव्हाडांवर टीका केली. त्यावरून जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरे माझा आवाज काढू शकतात असा आरोप केला होता. मात्र आता त्या ऑडिओ क्लिपमधील मल्लिकार्जुन पुजारी या व्यक्तीने समोर येऊन झालेली घटना सांगत चौकशीची मागणी केली आहे. 

मल्लिकार्जुन पुजारी म्हणाले की, २ वर्षाआधी एक घटना घडली होती. एक पीडित महिला माझ्याकडे आली आणि मला न्याय मिळवून देण्यासाठी मदतीची विनंती केली. बलाढ्य, पैसेवाल्या माणसाने माझा शारिरीक छळ केला असून मला कुणी मदत करत नाही तुम्ही मदत करा असं मला बोलली. त्यानंतर मी संबंधित महिलेचं ऐकून घेतले. त्यांच्याकडील पुरावे बघितले. त्यानंतर अंधेरीतल्या डी.एन नगर पोलीस ठाण्यात एका बड्या मुझ्यिक कंपनीच्या मालकावर ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांना सर्व घटना सांगून आरोपीला अटक करण्याची मागणी केली होती असं त्यांनी माहिती दिली. 

पण त्यावेळेस तत्कालीन महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पूर्ण ताकदीने आरोपीला वाचवण्यासाठी, त्यांची राजकीय शक्ती पणाला लावून आरोपीला वाचवले. त्यानंतर पीडित महिलेला आरोपीसमोर नतमस्तक होण्यास आव्हाडांनी भाग पाडले. हेच आव्हाड बदलापूरात जाऊन, पुण्यात जाऊन काय बोलतोय, वाह रे आव्हाड. संदीप देशपांडे यांनी हे प्रकरण पुन्हा बाहेर काढले तेव्हा त्याला उत्तर देताना आव्हाड म्हणाले, कोण तो ब्लॅकमेलर होता. ब्लॅकमेलिंग करत होता असा आरोप करतात. परंतु हे प्रकरण २ वर्षापूर्वीचे आहे. आमच्यावर ब्लॅकमेलिंगचे आरोप करायला आम्ही रस्त्यावर पडलोय काय? या प्रकरणाची गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एसआयटी चौकशी करावी. जर मी पैसे घेतले असतील तर ते बाहेर पडेल अन्यथा ज्या बलाढ्य आरोपीला वाचवण्यासाठी आव्हाडांनी तडजोड केली. आर्थिक देवाणघेवाण केली तेही बाहेर पडेल अशी मागणी मल्लिकार्जुन पुजारी यांनी केली आहे. टीव्ही ९ मराठीने ही मुलाखत प्रसारित केली. 

दरम्यान, बदलापूर प्रकरणी आरोपीला अटक झाली, परंतु तुमचं सरकार असताना त्या आरोपीला अटक का केली नाही? याचे उत्तर महिलांना द्या. आज राष्ट्रवादीवाले शपथा खातायेत परंतु तेव्हा तुमची आपुलकी कुठे गेली होती. माझ्यावर ब्लॅकमेलिंगचे आरोप करायचे असेल तर ते सिद्ध करून दाखव. आरोपीची, तुझी आणि माझीही नार्को टेस्ट करावी. सगळं समोर येऊ दे. एका मुलीला मदत करण्यासाठी माझ्या कुटुंबाला आणि मला किती त्रास झालाय हे आम्हाला माहिती आहे. संदीप देशपांडेंना मी धन्यवाद देतो, हे प्रकरण पुन्हा बाहेर काढले. या प्रकरणाची एसआयटी चौकशी झाली पाहिजे अशी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करतो असं मल्लिकार्जुन पुजारी यांनी सांगितले. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडSandeep Deshpandeसंदीप देशपांडेMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेस