शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

मडगाव स्फोटाची नव्याने चौकशी करा

By admin | Updated: June 22, 2016 04:14 IST

मडगाव स्फोटाची नव्याने चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी दाभोलकर कुटुंबीय पुढील आठवड्यात गोवा उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. २००९ च्या या स्फोटात वीरेंद्र सिंग तावडे

डिप्पी वांकाणी,  मुंंबईमडगाव स्फोटाची नव्याने चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी दाभोलकर कुटुंबीय पुढील आठवड्यात गोवा उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. २००९ च्या या स्फोटात वीरेंद्र सिंग तावडे याचा सहभाग असल्याची माहिती सीबीआयच्या तपासात पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि गोवा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला तेव्हा वीरेंद्र सिंग तावडे याचे नाव समोर आले नव्हते. नरेंद्र दाभोलकरांचे चिरंजीव हमीद दाभोलकर याबाबत बोलताना म्हणाले की, या प्रकरणाचा केवळ पुनर्तपास नव्हे, तर उच्च न्यायालयाच्या निगराणीखाली जलदगतीने याचा तपास व्हावा, यासाठी आम्ही पुढील आठवड्यात एक याचिका दाखल करणार आहोत. दरम्यान, सूत्रांनी सांगितले की, तावडेला २००९ च्या मडगाव स्फोटात अटक झाली असती, तर त्यानंतर कदाचित या तीन बुद्धिवाद्यांच्या हत्या झाल्याच नसत्या. सीबीआयने दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणात तावडेला अटक केलेली आहे. सारंग अकोलकर, रुद्र पाटील, प्रकाशअण्णा पाटील, प्रवीण निमकर, विनय पवार या पाच आरोपींच्या संपर्कात तावडे होता, असे तपासात पुढे आले आहे. कट रचण्यातही त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगण्यात येत आहे. हमीद म्हणाले, हत्येत सहभागी असलेल्या सारंग अकोलकर आणि अन्य आरोपींच्या छायाचित्रांसह एक राज्यव्यापी अभियान सुरू केले आहे. ज्या माध्यमातून या आरोपींबाबत माहिती असलेले नागरिक समोर येतील. १६ आॅक्टोबर २००९ रोजी झालेल्या मडगाव स्फोटप्रकरणी गोवा पोलिसांनी सनातन संस्थेच्या सहा सदस्यांना अटक केली होती.