शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

भारताला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवा!

By admin | Updated: June 9, 2014 01:21 IST

शोषित व्यक्ती आणि समाजाला सशक्त व सार्मथ्यवान बनविण्यासाठी सर्वांंनी आपली शक्ती झोकून द्यावी. राष्ट्रसाधनेसाठी गरीब आणि दलितांना सशक्त बनवा, शिवाय कुणाच्या भरोशावर न राहता

राष्ट्रऋषी लहिरी गुरुजी यांचे प्रतिपादन : शिवराज्याभिषेकदिन कार्यक्रमनागपूर : शोषित व्यक्ती आणि समाजाला सशक्त व सार्मथ्यवान बनविण्यासाठी सर्वांंनी आपली शक्ती झोकून द्यावी. राष्ट्रसाधनेसाठी गरीब आणि  दलितांना सशक्त बनवा, शिवाय कुणाच्या भरोशावर न राहता भारताला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे आवाहन राष्ट्रऋषी लहिरी गुरुजी यांनी येथे  केले. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने ‘सुराज मे भागीदारी’ या विषयावर जरीपटका येथील महात्मा गांधी सेन्टेनियल सिंधू हायस्कूलमध्ये रविवारी  विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, व्ही.के. सिंग तर प्रमुख अतिथी म्हणून अनिल सोले आणि  उद्योजिका पद्मश्री कमला सरोज मंचावर होते. ऋषी संस्कृतीचे जतन करालहिरी गुरुजी यांनी सांगितले की, माणसाला नराचा नारायण बनविणारी भारतीय संस्कृती आहे. या महान साधनेशी जुळून शिवाजी महाराज आणि  भगवान बुद्ध बना. भगवान श्रीरामने तब्बल १४ वर्षे पदयात्रा करून भारतातून जातीवाद आणि शोषणाची मानसिकता मिटविण्यासाठी भारतभर पदयात्रा  केली आणि दलितांमध्ये राहून त्यांचा विकास केला. प्रांतवाद, जातीवाद आणि पंथाच्या आधारावर राज्य सुरक्षित राहणार नाही. प्रभू श्रीराम आणि  भगवान गौतम बुद्धाचे जीवनचरित्र सांगताना ते म्हणाले की, ऋषी संस्कृतीचे जतन होईल तरच माझे राज्य सुरक्षित राहील, असे त्यांचे विचार होते.  त्यांनी मनात आणले असते तर ते राजा बनून जीवन जगू शकले असते. पण त्यांनी शोषितांची सेवा केली. ऋषी संस्कृती ही शिवाजी महाराज, संत  तुकाराम महाराज व रामदास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपात आली. आपण जन्मापासूनच ‘मी’पणाच्या अहंकारात गुरफटतो आणि  जीवनाचे नुकसान करून बसतो. प्रत्येकजण जन्माने एकसमान असतात. काहीजण दैनंदिन जीवन जगतो तर काही आपले जीवन देशसेवेसाठी वाहून  नेतो. महान लोकांच्या जीवनचरित्राचा अवलंब करा, असा संदेश त्यांनी दिला. व्ही.के. सिंग यांनी सांगितले की, स्वराज्य, परिवर्तन आणि विकासाच्या गोष्टीसाठी सर्वांंंनी एकत्रित यावे. नारे देऊन देश चालत नाही, लोकलढय़ात  सर्वांंचा सहभाग असावा. देशात संशोधने असतानाही दरवर्षी ४0 टक्के धान्य नष्ट होते तर वितरणात ४५ टक्के वीज वाया जाते. देशाला विकासावर  मार्गावर नेण्यासाठी सर्वांंंनी संघटित व्हावे.गडकरी म्हणाले की, सर्वांंंना न्याय द्या, सर्व धर्मांंंचा आदर करा, अशी शिकवण शिवाजी महाराजांनी दिली. गौतम बुद्धांनी अहिंसा व शांतीचा मार्ग  सांगितला. जातीवाद, धर्मवाद दूर होऊन भारतीय संस्कृतीचे जतन करा, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते. गरिबी आणि बेरोजगारी दूर  होईल तेव्हाच भारताचा विकास होईल. संचालन अशोक मेंढे यांनी केले. सुदर्शन गोस्वामी यांनी लहिरी गुरूजी यांचा परिचय करून दिला. यावेळी दीपक बजाज, प्रा. विजय केवलरमानी,  सुभाष पारधी, डी.डी. उके, राजन वाघमारे, अँड. कैलास वाघमारे, डॉ. अनिल बघेल, श्रीकांत बोरकर, राजेश हाडके, हितेश उके, सुरेश थूल,  आकाश पाटील, प्रदीप बनसोड, छन्ना मेश्राम, योगेंद्र गजभिये, दीपक बावनगडे, प्रशांत दहीवले, संघपाल उपरे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.  (प्रतिनिधी)