शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

व्यवहार्य तोडगा काढा, हट्ट नको; जागावाटपावर गृहमंत्री अमित शाह यांचा एकनाथ शिंदे - अजित पवार यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 06:23 IST

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने २२ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने १६ जागा मागितल्यानंतर भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

मुंबई : लोकसभेप्रमाणे विधानसभेलादेखील आपण एकत्रितपणे सामोरे जाणार आहोत. आता आपल्यासाठी लोकसभेची लढाई अत्यंत महत्त्वाची आहे. अशावेळी कोणताही हट्ट न ठेवता लोकसभेसाठी व्यवहार्य जागावाटप करा, असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्याचे समजते.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने २२ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने १६ जागा मागितल्यानंतर भाजपची डोकेदुखी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह मंगळवारी रात्री उशिरा मुंबईत पोहोचले. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे स्वागत केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे शाह यांच्यासोबत छत्रपती संभाजीनगर येथून आले. शाह यांनी अन्य चौघांसोबत सह्याद्री अतिथिगृहावर रात्री उशिरापर्यंत चर्चा केली.

भाजपने केलेली सर्वेक्षणे, राज्यातील महायुतीची व महाविकास आघाडीची परिस्थिती, महायुतीत कोणत्या मतदारसंघात निवडून येण्याची कोणत्या पक्षाची क्षमता आहे, हे मुद्दे लक्षात घेऊन जागावाटप होणे आवश्यक असल्याचे मत शाह यांनी मांडले. हट्ट सोडा असे केवळ आपल्या दोघांनाच माझे म्हणणे नाही. भाजपचे नेतेदेखील अशा काही जागांसाठी अडून बसले असतील की जिथे भाजपपेक्षा मित्रपक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकतो, तेथे भाजपनेदेखील एक पाऊल मागे घेतले पाहिजे, असे शाह म्हणाल्याचे समजते.

जिंकून येण्याच्या निकषावर जागावाटप- ४८ जागांचे महायुतीत कसे वाटप करायचे, या संदर्भातही शाह यांनी यावेळी चर्चा केल्याची माहिती आहे. ज्याचे खासदार त्याला संधी, असे सूत्र न ठेवता आगामी निवडणुकीत जिंकून येणारा उमेदवार कोणाकडे आहे हे बघितले पाहिजे.- शिवसेनेकडे जे १३ खासदार आहेत त्या सगळ्यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले जाते. त्यापैकी एक किंवा दोन मतदारसंघ भाजपला मिळतील आणि त्या मोबदल्यात एक दोन नवे मतदारसंघ शिंदे यांच्याकडे जाऊ शकतील, अशीही शक्यता आहे.- शाह हे महायुतीतील नेत्यांची बुधवारीदेखील चर्चा करतील. राज्यातील  युवा नेत्यांना एकत्रित बसून निर्णय करण्यास सांगतील अशी शक्यता आहे. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाAurangabadऔरंगाबादEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारlok sabhaलोकसभा