Mumbai MVA Vajramuth Sabha Teaser : महाविकास आघाडीची 'वज्रमूठ’ सभा 1 मे रोजी मुंबईत, सभेचा टीझर जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 20:27 IST2023-04-22T20:19:45+5:302023-04-22T20:27:19+5:30
यापूर्वी, छत्रपती संभाजीनगरात आणि नागपुरात महाविकास आघाडीची वज्रमूठसभा पार पडली आहे.

Mumbai MVA Vajramuth Sabha Teaser : महाविकास आघाडीची 'वज्रमूठ’ सभा 1 मे रोजी मुंबईत, सभेचा टीझर जारी
महाविकासआघाडीची वज्रमूठ सभा 1 मे रोजी मुंबईतील बीकेसी मैदानावर होणार आहे. या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते उपस्थितांना संबोधित करतील. बीकेसी मैदानावर होणाऱ्या या सभेचा टीझरही आज रिलीज करण्यात आला आहे. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा टीझर ट्विट केला आहे.
रिलीज करण्यात आलेल्या या टीझर सोबतच "संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ विराट जाहीर सभा आता आपल्या मुंबईत!" असे कॅप्शनही देण्यात आले आहे. तसेच, मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) येथे 1 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजता या सभेचे आयोजन करण्यात आल्याचेही संबंधित ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे.
संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ विराट जाहीर सभा आता आपल्या मुंबईत!
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) April 22, 2023
दिनांकः १ मे २०२३.
वेळः सायं. ५.३० वाजता.
स्थळ: वांद्रे-कुर्ला संकुल, मुंबई. pic.twitter.com/UmOMtn3ydL
यापूर्वी, छत्रपती संभाजीनगरात आणि नागपुरात महाविकास आघाडीची वज्रमूठसभा पार पडली आहे. मुंबईतील बीकेसी येथे होणाऱ्या वज्रमूठ सभेपूर्वी, उद्या 23 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील सावा मैदानानावर शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सभेचे आयोजन करण्यात आले आहे. येथे उद्धव ठाकरे जनतेला संबोधित करतील.