शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

अकोटात आगीमध्ये महासेल खाक!

By admin | Updated: February 21, 2017 01:51 IST

१0 लाखांचे नुकसान, चार तासांनी आग आटोक्यात

अकोट (जि. अकोला), दि. २0-: शहरातील सोनू चौक परिसरातील झी महासेल या प्रतिष्ठानाला २0 फेब्रुवारीला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये दुकानातील साहित्य जळून खाक झाल्याने ८ ते १0 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यावेळी आकोट, अकोला, अंजनगाव, तेल्हारा इत्यादी ठिकाणच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली. शहरातील अत्यंत वर्दळीच्या सोनू चौकाजवळील एका इमारतीमध्ये बँक ऑफ इंडिया शाखा आहे. या इमारतीमध्ये पहिल्या माळ्यावर गणेश अजाबराव ताठे रा. उज्ज्वलनगर अकोट यांचे झी महासेल प्रतिष्ठान आहे. या ठिकाणी घरगुती वापराच्या वस्तू, खेळणी, ज्वेलरी साहित्य, सौंदर्य प्रसाधने, कपडे तसेच इतर साहित्य विक्रीस ठेवण्यात आले होते. सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास अचानक या प्रतिष्ठानामधून धूर व आगीचे लोट उठायला लागले. घटनेची माहिती तत्काळ नगर परिषदेच्या अग्निशमन दल व पोलीस स्टेशनला देण्यात आली. अकोट व इतर ठिकाणचे अग्निशमन दल पोहोचेपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. आगीच्या प्रचंड ज्वाळा इमारतीच्या खिडकीतून उठत होत्या. दरम्यान अकोट, अकोला, अंजनगाव, तेल्हारा इत्यादी ठिकाणच्या अग्निशमन दलाच्या बंबांच्या मदतीने ही आग तब्बल चार तासांनी आटोक्यात आली; परंतु संपूर्ण साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने ८ ते १0 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सकाळची वेळ असल्याने मार्गावरील वर्दळ कमी होती, मात्र बघ्यांची मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, तहसीलदार विश्‍वनाथ घुगे, ठाणेदार सी.टी. इंगळे, नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे, मुख्याधिकारी गीता ठाकरे, नायब तहसीलदार राजेश गुरव, पोलीस उपनिरीक्षक शरद माळी, नगर परिषदेचे पदाधिकार्‍यांनी घटनास्थळ गाठले होते. ही भीषण आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. बँकेतील साहित्य हलविलेसोमवारी झी महासेलला लागेल्या आगीनंतर तळमजल्यावर असलेल्या बँक ऑफ इंडिया शाखेतील महत्त्वपूर्ण कागदपत्रे, रोख रक्कमसह इतर साहित्य तत्काळ हलविण्यात आले. बँकेच्या वर लागलेल्या आगीमुळे अग्निशमन दलाने आगीवर प्रचंड प्रमाणात पाण्याचा मारा केला. यामुळे बँकेत आग विझल्यानंतर मोठय़ाप्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे बँकेचे व्यवहार दिवसभर बंद होते.