शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचे पाणी उत्तर गुजरातला!

By admin | Updated: March 13, 2015 01:48 IST

पार-तापी-नर्मदेच्या खोऱ्यातील ८१३ दलघमी (दशलक्ष घनमीटर) पाण्यापैकी ६०० दलघमी पाणी गुजरातला देण्याचे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पार-तापी-नर्मदेच्या खोऱ्यातील ८१३ दलघमी (दशलक्ष घनमीटर) पाण्यापैकी ६०० दलघमी पाणी गुजरातला देण्याचे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले आहे. तसे पत्र त्यांनी केंद्रीय मंत्री उमा भारती यांना लिहिले आहे, असा गौप्यस्फोट माजी मंत्री छगन भुजबळ आणि जितेंद्र आव्हाड यांनी केला. मुख्यमंत्र्यांचे ते पत्रच त्यांनी पत्रकारांना दाखवले. महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देणार नाही, अशी जर मुख्यमंत्र्यांची भूमिका असेल तर त्यांनी तसा ठराव विधानसभेत आणावा, आम्ही तो एकमताने मंजूर करू; मात्र तसे न करता सभागृहाला सांगायचे एक आणि प्रत्यक्षात पडद्याआड करायचे दुसरेच हे बरोबर नाही, असेही भुजबळ म्हणाले. मुख्यमंत्र्यांचे भाषण होताच आम्ही यावर बोलणार होतो, पण अध्यक्षांनी आम्हाला बोलू दिले नाही. त्यामुळे हे पत्रच आम्ही आपल्याला दाखवत आहोत, असेही भुजबळ-आव्हाड म्हणाले. मुळात आपल्या प्रभावक्षेत्रातल्या पाण्यापैकी मोठा वाटा गुजरातला द्यायचा आणि त्याबदल्यात त्यांच्याकडून गिरणा खोऱ्यात ३०० दलघमी आणि काकरापारा धरणातून ४७० दलघमी पाणी घ्यायचे असे हे पत्र सांगते. रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री कार्यालयाने या पत्राबद्दल कोणताही खुलासा केला नाही.