शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी महाराष्ट्राचा स्वत:चा ‘पॅटर्न’ : वर्षा गायकवाड :

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 18:16 IST

शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी इतर राज्यांच्या चांगल्या गोष्टी घेणार

ठळक मुद्दे‘ई-बालभारती’ प्रकल्पांतर्गत व्हर्च्युअल क्लासरुम उद्घाटन शिक्षकांना अद्ययावत करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणारविविध योजना, शुल्करचना, भरती प्रक्रिया यासह शालेय शिक्षणामध्ये आमुलाग्र बदल

पुणे : ‘दिल्ली, राजस्थान, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांनी सरकारी शाळांचा दर्जा उंचावला आहे. त्यानुसार शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी इतर राज्यांच्या चांगल्या गोष्टी घेत वेगळा पॅटर्न राबविला जाईल,’ असे शालेय शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी सांगितले. ‘ई-बालभारती’ प्रकल्पांतर्गत व्हर्च्युअल क्लासरुमच्या उद्घाटनानंतर गायकवाड यांनी शुक्रवारी (दि. १४) पत्रकारांशी संवाद साधला. शाळा तसेच शिक्षकांची गुणवत्ता सुधारणे, विविध योजना, शुल्करचना, भरती प्रक्रिया यासह शालेय शिक्षणामध्ये आमुलाग्र बदल करण्यासाठी ‘थिंक टँक’ स्थापन करण्यात येणार आहे. विविध घटकांना त्यामध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे. याचा तयारी पुर्ण झाली असून या महिन्यात काम सुरू होईल, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले. विविध योजना, शिष्यवृत्ती योजनांचा आढावा घेतला जात आहे. या योजनांमध्ये कालानुरूप बदल व्हायला हवेत. सर्वांना समान व दर्जेदार शिक्षण मिळायला हवे. त्यानुसार बदल केले जातील. याबाबत शिक्षण आयुक्तांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पुढील सहा महिन्यात यासंदर्भात निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी नमुद केले.राज्यातील मराठी शाळांची पटसंख्या कमी होत असल्याबाबत गायकवाड म्हणाल्या, सरकारी शाळांमध्ये गुणवत्ता वाढायला हवी ही प्राथमिकता असेल. जिल्हा परिषद, पालिकांच्या काही शाळांमध्ये पाल्यांना प्रवेश मिळावा यासाठी पालक आग्रही आहेत. या शाळांची उदाहरणे विविध माध्यमातून लोकांपर्यंत अन्य शाळांपर्यंत पोहचविली जातील. मराठी शाळांचा दर्जा उंचावून विद्यार्थी वाढविण्याचा प्रयत्न करत आहोत.  पुर्व प्राथमिक शाळांमधील प्रवेश व वाढीव शुल्काविषयी आयुक्तांना आराखडा तयार करण्याच्या सुचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. -----------शिक्षकांना देणार प्रशिक्षणशाळांचा दर्जा उंचावण्याबरोबरच शिक्षकांना अद्ययावत करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत हे प्रशिक्षण दिले जाईल. त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतुदही करण्यात आली आहे. लवकरच या प्रशिक्षणाला सुरूवात होईल - वर्षा गायकवाड.---------

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणVarsha Gaikwadवर्षा गायकवाडcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी