महाराष्ट्र कधीही दिल्लीसमाेर वाकणार नाही -सुप्रिया सुळे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 13:12 IST2022-02-09T13:11:53+5:302022-02-09T13:12:36+5:30

काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट करून माेदींना प्रत्युत्तर दिले. त्यांनी लिहिले की, कधी काळी दाेन खासदार असलेला पक्ष आज काँग्रेस आहे म्हणूनच सत्तेत आहे. 

Maharashtra will never bow to Delhi says Supriya Sule | महाराष्ट्र कधीही दिल्लीसमाेर वाकणार नाही -सुप्रिया सुळे 

महाराष्ट्र कधीही दिल्लीसमाेर वाकणार नाही -सुप्रिया सुळे 

नवी दिल्ली : राज्यसभेत पंतप्रधान माेदींनी एकीकडे शरद पवारांचे काैतुक केले. मात्र, पवारांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माेदींवर टीका केली. त्या म्हणाल्या की, पंतप्रधानांना वारंवार महाराष्ट्रावर टीका करून काय आनंद मिळताे? ज्या राज्याने त्यांना सत्तेच्या शिखरावर पाेहाेचविले, त्या राज्याप्रती त्यांच्या मनात घृणा का आहे, याचे मला आश्चर्य वाटते. महाराष्ट्र कधीही दिल्लीसमाेर वाकला नाही आणि कधी वाकणारही नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

दाेन सदस्य असलेला पक्ष आज सत्तेत
माेदींवर टीका करताना विराेधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, पंतप्रधान अभिभाषणावर न बाेलता काँग्रेसविराेधात बाेलत हाेते. हे माेदींचेच फाेडा आणि राज्य करा धाेरण आहे. काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट करून माेदींना प्रत्युत्तर दिले. त्यांनी लिहिले की, कधी काळी दाेन खासदार असलेला पक्ष आज काँग्रेस आहे म्हणूनच सत्तेत आहे. 
 

Web Title: Maharashtra will never bow to Delhi says Supriya Sule