शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांना संजय राऊत यांचा मेसेज आला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 14:47 IST

Maharashtra Election Result 2019: राज्यात वेगळी समीकरणं जुळून येणार का याकडे लक्ष

मुंबई: सत्तापदांच्या समान वाटपावरून शिवसेना, भाजपामध्ये दबावाचं राजकारण सुरू आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देण्यात यावं असा आग्रह शिवसेनेनं धरला आहे. मात्र भाजपा मुख्यमंत्रिपद सोडायला तयार नाही. त्यामुळे आमच्याकडे इतर पर्याय खुले असल्याचं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर आणखी दबाव टाकला आहे. शिवसेनेकडे 175 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावादेखील त्यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाणार काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.आज मुंबईत राष्ट्रवादीची बैठक झाली. त्यात पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार यांनी आपल्याला शिवसेना खासदार संजय राऊत यांचा मेसेज आल्याचं सांगितलं. 'पक्षाची बैठक सुरू असताना मला संजय राऊत यांचा मेसेज आला. बैठक सुरू असल्यानं मी त्यांच्या मेसेजला उत्तर देऊ शकलो नाही. निवडणुकीनंतर संजय राऊत यांनी पहिल्यांदाच मला मेसेज केला आहे. त्यांना मला कशासाठी मेसेज केला हे माहीत नाही. मी त्यांना थोड्या वेळात फोन करेन आणि खासदार साहेब काय काम आहे, याबद्दल विचारणा करेन,' असं अजित पवार म्हणाले.भाजपा, शिवसेनेतला सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देणार का, असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर आम्ही महाआघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढलो. महाआघाडीत राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्यासह अनेक पक्षांचा समावेश आहे. त्यामुळे सर्व पक्षांशी चर्चा करुनच निर्णय घेतला जाईल, असं पवार यांनी सांगितलं.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा