शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: तावडेंच्या 'विनोदी' उपमा; शरद पवार म्हणजे अ‍ॅटम बॉम्ब, तर अजित पवार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 16:40 IST

Maharashtra Election Result 2019: फडणवीस, खडसे, अमित शहांनादेखील विविध फटाक्यांची नावं

मुंबई: सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. राजकीय नेतेदेखील याला अपवाद नाहीत. याच पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना माजी सांस्कृतिक मंत्री यांनी राज्यातील नेत्यांना विविध फटाक्यांच्या उपमा दिल्या. भाजपानं यंदाच्या निवडणुकीत तावडेंचं तिकीट कापलं. त्यांच्यावर नवी जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती पक्षानं दिली होती.विधानसभेची उमेदवारी न मिळाल्यानं विनोद तावडे शासकीय निवासस्थान सोडून स्वत:च्या घरी परतले. त्यामुळे जवळपास पाच वर्षानंतर तावडे कुटुंबाची दिवाळी त्यांच्या घरी साजरी होत आहे. यावेळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना तावडे यांनी विविध नेत्यांना फटाक्यांच्या उपमा दिल्या. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे सुतळी बॉम्बची क्षमता असणारा डांबरी फटाका असल्याचं म्हटलं.विनोद तावडेंनी माजी मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसेंना कधीच न विझणाऱ्या आणि ऊर्जा कधीही कमी न होणाऱ्या फटाक्याची उपमा दिली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणजे सर्वांना सामावून घेणारा पाऊस आहेत. तर भाजपा अध्यक्ष अमित शहा पक्षाला उंचीवर नेणारं रॉकेट असल्याचं तावडे म्हणाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणजे अ‍ॅटम बॉम्ब आहेत. मात्र हा अ‍ॅटम बॉम्ब कधी वाजतो, तर कधी वाजत नाही. या निवडणुकीत तो वाजला, असं तावडेंनी म्हटलं. फडणवीस यांना इको फ्रेंडली फटाक्याची उपमा देताना तावडेंनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. देवेंद्र फडणवीस म्हणजे विकास करणारा इको फ्रेंडली फटाका आहे, असं तावडे म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Vinod Tawdeविनोद तावडेSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारchandrakant patilचंद्रकांत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmit Shahअमित शहाEknath Khadaseएकनाथ खडसे