शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

महाराष्ट्र निवडणूक 2019: हा तर रोहितला ओटीत घेणाऱ्या मातांचा विजय; रोहित पवार यांच्या आई भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 16:50 IST

Maharashtra Election Result 2019: कर्जत जामखेडच्या जनतेचे रोहित यांच्या आईनं मानले आभार

अहमदनगर: भाजपाचे मंत्री प्रा. राम शिंदेंना पराभूत करत राष्ट्रवादी काँग्रेसचेरोहित पवार जायंट किलर ठरले. कर्जत जामखेडमध्ये पवार यांनी दणदणीत विजय मिळवला. यानंतर त्यांच्या मातोश्री सुनंदा राजेंद्र पवार यांचा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी कर्जत जामखेडमधील जनतेचे आभार मानले आहेत. 'राजकारणातील हे रोहितचे सर्वात मोठे व जोखमीचे पाऊल होते. कर्जत-जामखेडला त्यांची सर्वात जास्त गरज असल्याचे रोहितला लक्षात आले आणि त्याने इथे निवडणूक लढविण्याचे ठरवले आणि तो जिंकलाही. मूळात, आजचा विजय हा रोहितचा नाही तर, त्या यशोदा मातांचा आहे, ज्यांनी रोहितला त्यांचा ओटीत घेतलं. आजचा विजय त्या वानर सेनेचा आहे, ज्यांनी निस्वार्थीपणे रोहितच्या पाठीमागे उभे राहिले आणि हा विजय त्या तरुणाचाही आहे, ज्यांनी दारूला झुगारून रोहितचे हात बळकट केले,' अशा शब्दांत सुनंदा पवार यांनी कर्जत जामखेडमधल्या प्रत्येकाचे आभार मानले आहेत. 'मी, राजेंद्र दादा व आमचे पवार कुटुंबीय रोहितच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मित्रपक्ष, कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, आणि माझ्या कर्जत-जमखेड ग्रामस्थ, महिला, बच्चेकंपनी, माझे तरुण युवक-युवती आपणा सर्वांचेच मनापासून आभार मानते. खरं तर आभार मानून मी आपणाला परकं करत नाही परंतु रोहितवर तुम्ही जे प्रेम, आपुलकी, विश्वास आणि जो जिव्हाळा लावला त्याची मी आयुष्यभर ऋणी राहीन. तुमचं प्रेम रोहितवर सदैव बरसत राहू द्या हीच विनंती!,' अशा भावना सुनंदा यांनी व्यक्त केल्या आहेत.कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार विरुद्ध राम शिंदे असा संघर्ष असल्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष या लढतीकडे लागलं होतं. या मतदारसंघात चुरशीची लढाई होईल असा अंदाज होता. गेल्या 25 वर्षांपासून कर्जत जामखेडमध्ये भाजपाचं वर्चस्व होतं. मात्र तरीही रोहित यांनी राम शिंदेंचा तब्बल 43 हजार मतांनी पराभूत केला.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019karjat-jamkhed-acकर्जत-जामखेडRohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसRam Shindeराम शिंदे