शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: '...तर भाजपाला सत्तेपासून 'वंचित' ठेवता आलं असतं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 22:42 IST

Maharashtra Election Result 2019: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचं मत

नाशिक: वंचित बहुजन आघाडी आमच्यासोबत असती, तर विधानसभा निवडणुकीच्या निकालात वेगळं चित्र दिसलं असतं, असं राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं. आम्ही वंचितसोबत आघाडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेत सातत्य नव्हतं, असंदेखील ते म्हणाले. राज्यात अनेक ठिकाणी वंचित आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे महाआघाडीला फटका बसल्याची आकडेवारी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी महाआघाडी राहिली असती, तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवता आले असतं, असं मत भुजबळ यांनी व्यक्त केलं. विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या नाशिक जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या उमेदवारांचा सत्कार आज सायंकाळी राष्ट्रवादी भवनात करण्यात आला. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील काही जागांवर आघाडीला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे पराभवाला सामोरं जावं लागलं. मतांची विभागणी टाळण्यासाठी निवडणुकीपूर्वीच काँग्रेस आघाडीनं वंचितला सोबत घेण्याचे प्रयत्न केले. मात्र वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेत सातत्य नव्हतं असं भुजबळ म्हणाले. वंचित बहुजन आघाडी आमच्या सोबत असती, तर वेगळं राजकीय चित्र दिसलं असतं असं ते म्हणाले.राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना अशी सत्ता स्थापन होऊ शकते का यावर भुजबळ यांनी राजकारणात काहीही होऊ शकतं असं उत्तर दिलं. आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा कोणत्याही प्रस्ताव शिवसेनेनं दिलेला नाही, असं भुजबळ यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. विधानसभेत विरोधी पक्ष नेता कोण असेल, हे पक्षाचे आमदार ठरवतील, असं सांगून आपण विरोधी पक्ष नेतेपद स्वतः मागणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Chhagan Bhujbalछगन भुजबळVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपा