शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: राष्ट्रवादीचा भाजपावर 'बाण'; महायुतीमधील सुंदोपसुंदीवर चित्रातून निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 11:04 IST

Maharashtra Election Result 2019: भाजपा, शिवसेनेत सुरू असलेल्या चढाओढीवर राष्ट्रवादीचं भाष्य

मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास आठवडा होत आला तरी महायुतीचा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालेला नाही. शिवसेना सत्तेच्या समान वाटपावर ठाम आहे. पण अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्यास भाजपानं स्पष्ट नकार दिला आहे. याच परिस्थितीवर एनसीपीचे प्रवक्ते क्लायड क्रास्टोंनी चित्राच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. क्लायड क्रास्टोंनी एक चित्र ट्विट करत शिवसेना, भाजपातील सुंदोपसुंदीवर भाष्य केलं आहे. क्रास्टोंनी शिवसेना आणि भाजपाची निवडणूक चिन्हं वापरुन एक चित्र ट्विट केलं आहे. यामध्ये खाली भाजपाचं कमळ दाखवण्यात आलं आहे. तर वर काही अंतरावर शिवसेनेचा धनुष्यबाण रेखाटण्यात आला आहे. कमळाच्या वर असलेला धनुष्यबाण कमळाच्या दिशेनं रोखलेला आहे. 'एक म्हण आहे, डोक्यावर टांगती...' असं शीर्षक क्रास्टोंनी चित्राला दिलं आहे.   शिवसेना, भाजपामध्ये सत्ता स्थापनेच्या फॉर्म्युलावरुन चांगलीच जुंपली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या चर्चेत सत्तेच्या समान वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला होता. त्यामुळे शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळावं, अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. तर लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या चर्चेत भाजपानं मुख्यमंत्रीबद्दल कोणताही शब्द शिवसेनेला दिला नव्हता, असा पवित्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. पुढील पाच वर्ष मीच मुख्यमंत्री असेन, असंदेखील फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस