शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: बाप बापच असतो; कोल्हापूर 'भाजपामुक्त' केल्यावर राष्ट्रवादीची पोस्टरबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 11:54 IST

Maharashtra Election Result 2019: कोल्हापुरात भाजपाची धूळधाण; शिवसेनेलादेखील मोठा फटका

कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीत भाजपा मोठा पक्ष ठरला असला तरी, पक्षाच्या जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे एकहाती सत्ता मिळवण्याच्या भाजपाच्या मनसुब्यांना हादरा बसला. विशेष म्हणजे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं होमग्राऊंड असलेल्या कोल्हापुरात भाजपाला जोरदार धक्का बसला. विधानसभा निवडणुकीत भाजपाला कोल्हापुरात एकही जागा मिळवता आली नाही. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा भाजपामुक्त झाला आहे. यानंतर राष्ट्रवादीनं कोल्हापुरात बॅनर लावत भाजपाला डिवचलं आहे. 'बाप बापच असतो' असा मजकूर असलेले बॅनर राष्ट्रवादीकडून कोल्हापुरात लावण्यात आले आहेत. या बॅनरवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा मोठा फोटो आहे. कोल्हापुरात भाजपाचे दोन आमदार होते. त्यांना भाजपानं उमेदवारी दिली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. भाजपा आमदार अमल महाडिक यांना काँग्रेसच्या ऋतुराज पाटील यांनी पराभूत केलं. तर भाजपा आमदार सुरेश हळवणकर यांचा काँग्रेसमधून बंडखोरी करून बाहेर पडलेल्या प्रकाश आव्हाडेंनी पराभव केला. कोल्हापूर जिल्ह्यातल्या सात जागांवर महाआघाडीनं विजय मिळवला. जिल्ह्यात काँग्रेसनं चार, राष्ट्रवादीनं दोन तर जनसुराज्य पक्षानं एका जागेवर विजय नोंदवला. याशिवाय काँग्रेसमधून बाहेर पडून आमदार झालेले प्रकाश आव्हाडे महाआघाडीसोबत जाण्याची शक्यता आहे. तर इतर दोन मतदारसंघांतल्या जनतेनं शिवसेनेला कौल दिला आहे. गेल्या निवडणुकीत महायुतीनं जिल्ह्यातल्या १० पैकी ८ जागा जिंकल्या होत्या. मात्र आता महायुतीकडे दोन जागा आहेत. जिल्ह्याला बसलेल्या पुराचा फटका भाजपादेखील बसल्याचं निकालानंतर बोललं जात आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलShiv Senaशिवसेना