शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: (वेगळा) विदर्भ नडला अन् भाजपाचा गाडा वाईट्ट घसरला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 20:28 IST

Maharashtra Election Result 2019: भाजपाच्या जागांमध्ये घट; विदर्भात मोठा फटका

मुंबई: राज्यात महायुतीची सत्ता कायम राहणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. मात्र भाजपा, शिवसेनेच्या जागा कमी झाल्या आहेत. अब की बार 200 पार अशी घोषणा महायुतीनं केली होती. मात्र प्रत्यक्षात महायुती जवळपास 160 जागा जिंकताना दिसत आहेत. आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत. मात्र समोर कोणी पैलवानच दिसत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांची खिल्ली उडवली होती. मात्र विरोधकांनी चांगली लढत देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली लढणाऱ्या भाजपाला दणका दिला.विजयी उमेदवार आणि आघाडी यांचा विचार करता भाजपाच्या पारड्यात सध्या 104 जागा आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपाला 122 जागा जिंकल्या होत्या. मात्र या निवडणुकीत भाजपाला 18 जागांवर फटका बसला. योगायोगाची गोष्ट म्हणजे भाजपानं विदर्भात नेमक्या अठराच जागा गमावल्या आहेत. विदर्भातल्या एकूण 63 पैकी तब्बल 45 जागांवर भाजपानं 2014 मध्ये विजय मिळवला होता. मात्र यंदा विदर्भात भाजपाला 27 जागांवर समाधान मानावं लागलं आहे.मुख्यमंत्र्यांचं होमग्राऊंड समजल्या जाणाऱ्या विदर्भात महाआघाडीनं जोरदार मुसंडी मारली. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला विदर्भात 10, तर राष्ट्रवादीला अवघी एक जागा मिळाली होती. मात्र यंदा काँग्रेस, राष्ट्रवादीनं विदर्भात भाजपाला धक्का दिला. या निवडणुकीत काँग्रेसनं विदर्भात 17 जागा जिंकल्या. तर राष्ट्रवादीनं 6 जागा मिळवल्या. यंदा विदर्भात इतरांनी 8 जागांवर विजय मिळवला. भाजपाला सत्ता दिल्यास वेगळ्या विदर्भाचा मुद्दा निकाली लागेल, अशी जनभावना होती. त्यामुळेच गेल्या निवडणुकीत विदर्भवासीयांनी भाजपाला भरभरुन मतदान केलं होतं. मात्र गेल्या पाच वर्षांत वेगळ्या विदर्भाच्या हालचाली झाल्या नाहीत. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा उपस्थित केला होता. मुख्यमंत्रीपदाची साडेचार वर्षे पूर्ण झाल्यानंतर मी स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा मार्गी लावणार असल्याचं फडणवीसांनी आपल्याला खासगीत सांगितलं होतं, असं पवार यांनी म्हटलं होतं. मात्र ही बाब फडणवीस यांनी फेटाळून लावली. त्याचा फटका भाजपाला विदर्भात बसला का, याची चर्चा आता सुरू झाली आहे.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Vidarbhaविदर्भBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस