शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
2
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
3
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
4
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
5
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
6
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
7
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
8
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
9
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
10
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
11
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
12
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
13
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
14
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
15
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
16
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
17
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
18
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
19
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
20
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र

महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपाची शिवसेनेला 'अर्थ'पूर्ण ऑफर; 'मातोश्री'कडून सकारात्मक प्रतिसाद मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2019 11:49 AM

Maharashtra Election Result 2019 शिवसेना, भाजपामध्ये सत्ता वाटपाच्या फॉर्म्युलावरून संघर्ष

विधानसभा निवडणुकीच्या निकाल येऊन 10 दिवस उलटले असले तरी अद्याप राज्यात सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. विशेष म्हणजे राज्यातल्या जनतेनं महायुतीला स्पष्ट कौल दिलेला असतानाही सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. मुख्यमंत्रिपदासह सर्व सत्तापदांचं समान वाटप, यावर शिवसेना ठाम आहे. तर भाजपा मुख्यमंत्रिपद सोडायला तयार नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील तणाव वाढला. याच पार्श्वभूमीवर भाजपानं शिवसेनेला नवी ऑफर दिल्याचं समजतं.लोकसभा निवडणुकीवेळी ठरल्याप्रमाणे सत्तापदांचं समान वाटप व्हावं अशी मागणी शिवसेनेनं निकालापासून लावून धरली आहे. त्यामुळे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद मिळावं यासाठी शिवसेना आग्रही आहे. त्यामुळे भाजपानं शिवसेनेला नवी ऑफर दिली आहे. मुख्यमंत्रिपद भाजपाकडे राहील. मात्र मंत्रिमंडळात शिवसेनेला समान वाटा देऊ. याशिवाय अर्थ, महसूल मंत्रिपदही देऊ, असा प्रस्ताव भाजपानं दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे महत्त्वाची खाती स्वीकारून मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडणार का याकडे लक्ष लागलं आहे.अहो आश्चर्यम्! संजय राऊत यांची पत्रकार परिषद भाजपावर टीका न करताच संपलीतत्पूर्वी इंडियन एक्स्प्रेनं भाजपाकडून शिवसेनेला देण्यात आलेल्या एका प्रस्तावाबद्दलचं वृत्त काल प्रसिद्ध केलं होतं. मुख्यमंत्रिपद भाजपाकडे, शिवसेनेला मंत्रिमंडळात समान वाटा, महत्त्वाची खाती असा उल्लेख भाजपाच्या प्रस्तावात होता. त्यावर मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिवसेनेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात दोन अतिरिक्त मंत्रिपदं (एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री) दिली जावीत. पक्षाच्या दोन ज्येष्ठ नेत्यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात यावी. याशिवाय राज्यातील सहकार क्षेत्रातल्या संस्थांमध्ये शिवसेनेचं 50 टक्के नियंत्रण असावं, अशा मागण्या उद्धव ठाकरेंकडून करण्यात आल्याचं वृत्तात म्हटलं होतं. 'लग्न ठरवायच्या बैठकीतच जर एवढी भांडणं झाली तर पुढे संसार कसा नीट होणार?'शुक्रवारी रात्री उशिरा फडणवीस यांनी एका मध्यस्थाच्या माध्यमातून उद्धव यांना हा प्रस्ताव देण्यात आल्याचं समजतं. या प्रस्तावाबद्दल उद्धव ठाकरे सकारात्मक असून त्यांनी फडणवीसांसोबत चर्चा करण्याची तयारीदेखील दर्शवली. त्यामुळे पुढील दोन दिवसात फडणवीस आणि ठाकरे यांच्यात बैठक होण्याची शक्यता आहे. याआधी भाजपानं शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह 16 मंत्रिपदांचा प्रस्ताव दिला होता. तर भाजपा आणि महायुतीतल्या लहान पक्षांना 27 ते 29 मंत्रिपदं दिली जाणार होती. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv Senaशिवसेना