शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक निकालः पंकजा मुंडेंनी पराभवानंतर दिली राज ठाकरेंसारखी प्रतिक्रिया; बघा काय म्हणाल्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 14:06 IST

Maharashtra Election Result 2019: परळीत धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंचा पराभव

बीड: भाऊ बहीण आमनेसामने आल्यानं बीडमधल्या परळीत काय घडणार याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. या प्रतिष्ठेच्या लढतीत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी जवळपास 20 हजार मतांनी विजय मिळवला. मतदान झाल्यानंतरही बीडमधल्या घडामोडी लक्षवेधी ठरल्या होत्या. मुंडे बंधू भगिनींनी एकमेकांवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे ही लढत राज्यासाठी लक्षवेधी ठरली. पंकजा मुंडे मंत्री होत्या. त्यामुळे त्यांचा पराभव धक्कादायक मानला जात आहे. खुद्द पंकजा यांनीदेखील निकालानंतर तशीच भावना बोलून दाखवली.लोकसभा निवडणुकीत भाजपानं स्वबळावर सत्ता मिळवत 300 चा आकडा पार केला. त्यावर 'अनाकलनीय' अशा एका शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली होती. पंकजा मुंडेंनीदेखील याच शब्दाचा वापर करत त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या. मतदारांनी दिलेला कौल मान्य असल्याचं म्हणत कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, असं आवाहन त्यांनी केलं. बीड जिल्ह्यातील राजकारणाचा वेगळा चेहरा निवडणुकीत पाहायला मिळाल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलं. बीडच्या परळीत मुंडे बंधू भगिनी आमनेसामने असल्यानं राज्याचं लक्ष या लढतीकडे लागलं होतं. प्रचारादरम्यान धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी एकमेकांवर तोफ डागली होती. प्रचार संपल्यानंतरही दोघांमधली धुसफूस कायम होती. यानंतर आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. त्यात धनंजय मुंडेंनी आधीपासूनच आघाडी घेतली होती. हीच आघाडी त्यांनी अखेरपर्यंत कायम ठेवत पंकजा मुंडेंचा मोठा पराभव केला. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019parli-acपरळीPankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस