शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
4
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
5
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
6
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
7
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
8
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
9
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
10
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
11
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
12
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
13
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
14
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
15
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
16
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
17
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
18
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
19
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
20
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्र निवडणूक 2019: 13 दुणे 'स्पेशल 26'... भाजपाकडून शिवसेनेला मंत्रिपदांचा फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 15:34 IST

Maharashtra Election Result 2019: भाजपाकडून शिवसेनेला नवी ऑफर

मुंबई: विधानसभेचा निकाल लागून आठवडा होत आला तरी शिवसेना, भाजपाला सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला निश्चित करता आलेला नाही. अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद मिळावं असा शिवसेनेचा आग्रह आहे. यासाठी शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या चर्चेचा दाखला दिला आहे. मात्र त्यावेळी भाजपानं शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाबद्दल कोणताही शब्द दिला नव्हता, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. पुढील पाच वर्ष मीच मुख्यमंत्री राहणार असल्याचं म्हणत फडणवीस यांनी भाजपाची भूमिका स्वच्छपणे मांडली आहे. यानंतर आता भाजपानं शिवसेनेला नवी ऑफर दिली आहे.मुख्यमंत्रिपद मिळणार नाही. पण उपमुख्यमंत्रिपदाबद्दल चर्चा होऊ शकते, असं भाजपानं नव्या प्रस्तावात म्हटलं आहे. भाजपानं शिवसेनेला 13-26 चा फॉर्म्युला दिला आहे. यानुसार शिवसेनेला एकूण 13 मंत्रिपदं दिली जाऊ शकतात. तर भाजपा 26 मंत्रिपदं स्वत:कडे ठेऊ शकते. चार महत्त्वाची मंत्रिपदं शिवसेनेला देण्याची भाजपाची तयारी नाही. महसूल, नगरविकास, गृह, अर्थ मंत्रालयं भाजपा आपल्याकडेच ठेवेल.उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेच्या वाट्याला आल्यास त्यावर लगेच आदित्य ठाकरेंची वर्णी लावू नये, असा मोठा मतप्रवाह पक्षात आहे. त्याऐवजी ज्येष्ठत्वाचा मान राखत सुभाष देसाई किंवा एकनाथ शिंदे यांना संधी द्यावी असा विचार आहे. त्यातही देसाई यांना सुरूवातीचे दोन-अडीच वर्षे उपमुख्यमंत्रीपद द्यावं आणि नंतर ते आदित्य यांच्याकडे सोपवावं. देसाईंना सुरुवातीला उपमुख्यमंत्रीपद दिलं तर अडीच वर्षांनंतर ते सोडताना फारशी खळखळ होणार नाही. एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद दिले आणि नंतर त्यांच्याऐवजी आदित्य यांना आणल्यास राजी-नाराजीचे सूर उमटू शकतात हे लक्षात घेता देसाई यांना संधी दिली जाऊ शकते. तानाजी सावंत यांना शेवटच्या टप्प्यात ज्या पद्धतीनं मंत्रिपद मिळालं आणि नंतर ते मातोश्रीच्या ज्या पद्धतीनं ते निकट गेले, त्यावरून त्यांचे नावही चर्चेत आहे. आदित्य यांना लगेच उपमुख्यमंत्री करण्याऐवजी त्यांची शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाऊ शकते. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे