शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: राज्यात साथ देऊ, पण...; राष्ट्रवादीची शिवसेनेसमोर 'अवजड' अट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 09:49 IST

Maharashtra Election Result 2019 राष्ट्रवादी सहकार्य करण्यास तयार; पण अटी लागू

मुंबई: विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा कमी झाल्यानं मुख्यमंत्रिपदाबद्दल 'प्रचंड आशावादी' असलेल्या शिवसेनेसमोर राष्ट्रवादीनं एक 'अवजड' आणि 'अवघड' अट ठेवल्याचं समजतं. राज्यात राष्ट्रवादी शिवसेनेला साथ देईल. मात्र त्यासाठी शिवसेनेनं भाजपासोबतचे सर्व संबंध तोडावेत. केंद्रात अवजड उद्योग मंत्रालय सांभाळणाऱ्या अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी अट राष्ट्रवादीकडून घालण्यात आल्याचं पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितल्याचं वृत्त 'मुंबई मिरर'नं प्रसिद्ध केलं आहे.विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी शिवसेनेला मदत करेल, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता. मात्र भाजपापासून लांब राहण्याबद्दलच्या निर्णयावर शिवसेना कितपत गंभीर आहे, हे राष्ट्रवादीला पाहायचं आहे. त्यामुळेच शिवसेनेनं भाजपासोबत असलेले त्यांचे केंद्रापासूनचे संबंध संपुष्टात आणावेत, अशी अट राष्ट्रवादीनं ठेवली आहे.'राष्ट्रवादीशी आघाडी करून काँग्रेसच्या पाठिंब्यानं सरकार स्थापन करू असा दावा शिवसेना करते. हे समीकरण त्यांना खरोखरच जुळवून आणायचं असेल, तर त्यांनी केंद्रातलं मंत्रिपद सोडावं. त्यांनी असं पाऊल उचललं तरच ते गंभीर असल्याचं आम्हाला समजेल. शिवसेना हा निर्णय घेणार नसेल, तर मग यात काही अर्थ नाही,' असं राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्यानं म्हटलं. शिवसेना केंद्रातलं मंत्रिपददेखील राखणार आणि राज्यात आम्ही राज्यात त्यांना पाठिंबा द्यावा ही अपेक्षादेखील ठेवणार. असं कसं चालेल?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी मे महिन्यात केंद्रात अवजड उद्योग मंत्रालयाची धुरा स्वीकारली. त्याआधी मोदी-1 मध्येही हे मंत्रालय शिवसेनेकडेच होतं. शिवसेना खासदार अनंत गीते यांच्याकडे या मंत्रालयाची जबाबदारी होती. मात्र यंदा गीते पराभूत झाले. त्यानंतर सावंत यांनी अवजड उद्योग मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. सावंत यांनी लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा काँग्रेस नेते मिलिंद देवरांचा पराभव केला. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाArvind Sawantअरविंद सावंत