शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 06:54 IST

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: बंडखोरांनाही दाखविले गेले आस्मान, माजी खासदारांसह सर्वच बंडखोरांची सद्दी मतदारांनी संपविली. विशेष म्हणजे, काँग्रेसचे मातब्बर नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना पराभव पहावा लागला

 किरण अग्रवालजळगाव - उत्तर महाराष्ट्रातील जळगाव व धुळे जिल्ह्यात महायुतीला ‘शत-प्रतिशत’ जागा देतानाच नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात उद्धवसेनेला साफ नाकारले गेल्याने विभागात ‘महायुती’ने लक्षणीय वर्चस्व स्थापित केले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर व अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर अशा दोनच जागा काँग्रेसला  तर कर्जत जामखेडची एकमात्र जागा  शरद पवार गटाला लाभली आहे.

यावेळचा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीमध्ये निकराचा सामना झाला. त्यात मोठ्या प्रमाणातील बंडखोर व अपक्ष उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती व्यक्त होत होती; पण समीर भुजबळ, हिना गावित व ए.टी. पाटील अशा तिघा माजी खासदारांसह सर्वच बंडखोरांची सद्दी मतदारांनी संपविली. विशेष म्हणजे, काँग्रेसचे मातब्बर नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना पराभव पहावा लागला असून, जळगाव जिल्ह्यातील रावेर व धुळे ग्रामीणची जागाही काँग्रेसच्या हातून गेल्याने जळगाव, धुळे व नाशिक हे तीन जिल्हे काँग्रेसमुक्त झाले आहेत.

‘एमआयएम’ने गेल्यावेळी मालेगाव मध्यसह धुळे शहर मतदारसंघातील जागा काबीज केली होती; पण यंदा ‘एक है तो सेफ है’च्या नाऱ्यामुळे धुळे शहराची जागा भाजपने विक्रमी मताधिक्याने खेचून घेतली आहे. उद्धवसेनेला अपयश आले असताना शिंदेसेनेने अन्य जागा राखताना धुळे व नंदुरबार जिल्ह्यांमध्येही एक-एक जागा मिळवून खाते उघडले आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, गिरीश महाजन यांना ‘जरांगे फॅक्टर’चा कथित अडथळा न होता विकासावर मतदारांनी मोहोर उमटविली आहे.

पाच मुद्द्यांत विश्लेषण

महायुतीमधील तीनही प्रमुख पक्षांची एकसंधता व लाडक्या बहिणींचे आशीर्वाद कामी आले.लोकसभेसाठीच्या राज्यातील निकालापासून धडा घेऊन भाजपने केलेले ‘मायक्रो प्लॅनिंग’ उपयोगी पडले. महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकजिनसीपणे प्रचारात न दिसल्याचा फटका.कांद्याचा प्रश्न मिटला; पण कापूस, सोयाबीन, दूध दराच्या मुद्द्यावर आघाडीला रान पेटवता आले नाही.विभागात जाहीर प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात महाआघाडीला ‘टेम्पो’ राखता आला नाही.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024congressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारMahayutiमहायुती