शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बंडखोर, आपसांतील उमेदवारांमुळे मविआला फटका; जागावाटपाचा घोळही ठरला अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 08:01 IST

सोलापूर दक्षिण मतदारसंघांवरून मतभेद पोहोचले टोकाला, दोन बंडखोर आणि उद्धवसेनेच्या उमेदवारांच्या मतांची बेरीज ही देशमुख यांना मिळालेल्या मतांपेक्षा अधिक आहे. 

दीपक भातुसेमुंबई - महाविकास आघाडीतील जागावाटपाचा घोळ, बंडखोरी तसेच काही मतदारसंघात अधिकृत उमेदवाराविरोधात मविआतील पक्षाने दिलेले उमेदवार यामुळे काही जागांवर मविआला पराभवाचा फटका बसला आहे.

सोलापूर दक्षिण मतदारसंघावरून तर मविआतील मतभेद टोकाला पोहोचले. येथे काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराचा उघडपणे प्रचार केल्याने उद्धवसेनेत नाराजी आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे बाबा मिस्त्री आणि धर्मराज काडादी हे दोन बंडखोर उमेदवार उभे होते. मिस्त्री यांनी २६,७०६ मते घेतली, तर काडादी यांना १८,७४७ मते पडली. पराभूत झालेले उद्धवसेनेचे उमेदवार अमर पाटील यांना ३९,८०५ मते मिळाली. भाजपच्या सुभाष देशमुखांचा येथे ७७,१२७ मतांनी विजय झाला. दोन बंडखोर आणि उद्धवसेनेच्या उमेदवारांच्या मतांची बेरीज ही देशमुख यांना मिळालेल्या मतांपेक्षा अधिक आहे. 

नांदेड उत्तर मतदारसंघात काँग्रेस आणि उद्धवसेनेचे उमेदवार उभे होते. काँग्रेसचे अब्दुल्ल सत्तार गफुर यांनी ७९,६८२ मते घेतली, तर उद्धवसेनेच्या संगीता पाटील यांना २२,७०६ मते मिळाली. येथे शिंदेसेनेचे बालाजी कल्याणकर ३५०२ मतांनी विजयी झाले. पंढरपूरमध्ये काँग्रेस आणि शरद पवार गटाचे उमेदवार समोरासमोर उभे होते. काँग्रेसचे उमेदवार भारत भालके यांना १ लाख १६ हजार ७३३ मते मिळाली, तर शरद पवार गटाचे अनिल सावंत यांना १० हजार २१७ मते मिळाली. येथे भाजपचे समाधान औताडे ८ हजार ४३० मतांनी विजयी झाले.

कुठे काय झाले? 

उरण : शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांचा ६,५१२ मतांनी पराभव झाला. उद्धवसेनेचे मनोहर भोईर यांना येथे ६९,८९३ मते मिळाली. हिंगोली : उद्धवसेनेच्या रूपाली पाटील यांचा १०,९२६ मतांनी पराभव झाला. येथे काँग्रेसचे बंडखोर बाबूराव पाटील यांना २२,२६७ मते मिळाली. परतूर : उद्धवसेनेचे आसाराम बोराडे यांचा ४,७४० मतांनी पराभव. येथे काँग्रेस बंडखोर सुरेश जेथलिया यांना ५३,९२१ मते. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीmaharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेस