शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ज्यांनी गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही, माझा एकच शब्द वळसे पाटलांना पराभूत करा'; शरद पवारांनी डागली तोफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 21:23 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका केली.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. मागील वर्षी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीतील नऊ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात खासदार शरद पवार यांच्या जवळचे मानले जाणारे दिलीप वळसे पाटील यांचाही समावेश होता. दरम्यान, आता खासदार शरद पवार विधानसभा निवडणुकीत दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात मैदानात उतरले आहेत. 

आज खासदार शरद पवार यांनी आंबेगाव विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी दिलीप वळसे पाटील यांचा पराभव करा असं सांगितलं. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. 

निवडणूक अधिकाऱ्यांचा धडाका! ठाकरेंची सलग तीन दिवस, तर शिंदे-फडणवीस-पवार यांची एकाच दिवसात बॅग तपासणी

खासदार शरद पवार म्हणाले, ज्यांना मी शक्ती दिली. ज्यांना मी अधिकार दिला. ज्यांचा मी सन्मान केला, त्यांच्याकडून मला काही नको. आज लोक त्यांच्यावर नाराज आहेत,  त्यांनी आम्हा लोकांची साथ सोडली, आमचा शब्द पाळला नाही. विरोधकांच्याबरोबर मंत्रिमंडळात बसले हे लोकांना आवडलं नाही. हे लोक सांगत असतात, लोकांना खोट सांगतात, आमचे आणि पवार साहेबांचे संबध चांगले आहेत असं लोकांना सांगतात. पण असं काही सुद्धा नाही. माझी बायको वर्षातून एकदा भीमाशंकरला दर्शनाला येतात. आम्हा लोकांची साथ सोडल्यानंतर आता परवा त्या भीमाशंकरला गेल्या होत्या.  तेव्हा मी त्यांना विचारलं तुमची व्यवस्था कोणी केली. तेव्हा त्या म्हणाल्या मी डायरेक्ट दर्शनाला गेलो, त्या म्हणाल्या ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांच्या दारात आम्ही गेलो नाही.  आम्ही डायरेक्ट भीमा शंकरच्या दारात गेलो, असंही शरद पवार म्हणाले. 

दिलीप वळसे पाटलांवर साधला निशाणा

"दिलीप वळसे पाटील सांगतात, निवडणुका जवळ आल्या शरद पवार येतील माझ्याबद्दल काही बोलणार नाहीत. यांच्याबद्दल आता काय बोलायचं, यांनी बोलायला काहीच ठेवलेले नाही. त्यांनी एकच गोष्ट ठेवली त्यांनी गद्दारी केली. जो गद्दारी करतो त्या गद्दाराला शिक्षा द्यायची असते. ३५० वर्षापूर्वी शिवछत्रपतींच्या नंतर संभाजीराजेंच्यासोबत गणोजी शिर्के यांनी गद्दारी केली ती महाराष्ट्र विसरलेला नाही. गणोजीला आता सुट्टी नाही, ज्यांनी गद्दारी केली आता त्यांना सुट्टी नाही. आता या निवडणुकीत वळसे पाटील यांना पराभूत करा, असा निशाणा खासदार शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर लगावला.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारDilip Walse Patilदिलीप वळसे पाटील