शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "उद्धव ठाकरेंच्या आणि भाजपाच्या बैठका सुरू, निवडणुकीनंतर एकत्र येणार"; बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 15:40 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकांची सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या जागावाटपावर चर्चा सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीने मोठी तयारी केली असून उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान, आता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाच्या बैठका सुरू असल्याचा मोठा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केला. यामुळे आता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. 

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : भाजपाला धक्का! मंदा म्हात्रेंविरोधात संदीप नाईक यांनी फुंकली 'तुतारी'

प्रकाश आंबेकर यांनी आज गोंदिया येथे पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला. आंबेडकर म्हणाले, मी सगळ्या लोकशाहीवादी आणि त्याचबरोबर मुस्लिम समाजाला आवाहन करत आहे की, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या आणि भाजपाची बैठका सुरू आहेत. विधानसभा एकदा संपली की हे परत एकदा भाजपासोबत जातील, असा मोठा गौप्यस्फोट आंबेडकर यांनी केला.

"याची भीती व्यक्त केली जात आहे.  म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना मुस्लिम समाज त्यांच्याकडून आश्वासन घ्यायला सांगत आहे. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी कशा पद्धतीने त्यांना आश्वासन देत आहे हे पाहणे महत्वाचे आहे, असंही आंबेडकर म्हणाले. 

वंचितची पाचवी यादी जाहीर

:प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने यंदा  विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्याचा सपाटा लावला आहे. वंचित आघाडीकडून आज आपल्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली असून वंचितने आज १६ जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली.

वंचितकडून पाचव्या यादीत कोणाकोणाला संधी? १. भुसावळ - जगन देवराम सोनवणे२. मेहकर - डॉ. ऋतुजा चव्हाण३. मूर्तिजापूर - सुगत वाघमारे ४. रिसोड - प्रशांत सुधीर गोळे५. ओवळा माजिवडा- लोभर्सिग गणपतराव राठोड६. ऐरोली - विक्रांत दयानंद चिकणे७. जोगेश्वरी पूर्व - परमेश्वर रणशुर ८. दिंडोशी - राजेंद्र तानाजी ससाणे ९. मालाड - अजय आत्माराम रोकडे १०. अंधेरी पूर्व - अॅड. संजीवकुमार कलकोरी११. घाटकोपर पश्चिम - सागर रमेश गवई १२. घाटकोपर पूर्व - सुनिता मायकवाड१३. चेंबूर - आनंद भीमराव जाधव १४. बारामती- मंगलदास तुकाराम निकाळजे १५. श्रीगोंदा - अण्णासाहेब शेलार १६. उदगीर - प्रा. डॉ. शिवाजीराव मरेप्पा देवनाळे  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरElectionनिवडणूक 2024Devendradada Deshmukhदेवेंद्रदादा देशमुखUddhav Thackerayउद्धव ठाकरे