शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीमधील वाद मिटला, कोल्हेंनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली; फेसबुकवर केली भावनिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 16:19 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाच्या बैठकांचे सत्र सुरू आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत बैठका सुरू आहेत. तर दुसरीकडे महायुतीमध्ये काही मतदारसंघात उमेदवारीवरुन वाद असल्याचे समोर आले. कोपरगाव विधानसभा मतदारसंघ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला गेल्यामुळे भाजपा नेत्या स्नेहलता कोल्हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. दरम्यान, आता त्यांनी फेसबुक पोस्ट करत आपण विधानसभा निवडणूक लढवत नसल्याचे जाहीर केले आहे. 

काही दिवसापूर्वी विवेक कोल्हे यांनी खासदार शरद पवार यांनी  भेट घेतली होती.  माध्यमांसमोर त्यांनी अनेकवेळा उमेदवारीवरुन उघड-उघड नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, आता ही नाराजी दूर करण्यात भाजपाला यश आले आहे.

दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्नेहलता कोल्हे, विवेक कोल्हे यांच्यात बैठक झाली. यानंतर स्नेहलता कोल्हे यांनी फेसबुकवर भावूक  पोस्ट केली आहे. 

स्नेहलता कोल्हे यांची पोस्ट काय?

सर्वांना नमस्कार..

निवडणुकीचे बिगुल वाजले बऱ्याच गोष्टी घडल्या. या दरम्यान गेले अनेक दिवस आपण सर्वजण मला,दादांना आणि खास करून विवेकभैय्यांना विविध माध्यमांतून संपर्क करण्याचा प्रयत्न करता आहात. तुम्हा सर्वांना असणारा विश्वास आणि फक्त आपला कोपरगाव मतदारसंघच नव्हे तर अगदी राज्यभरातून अनेक ठिकाणी आपले हितचिंतक आपल्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहेत..

आम्हाला कल्पना आहे हा काळ सर्वांसाठी अतिशय घालमेल होणारा आहे. तुमच्या भावना आणि कोल्हे कुटुंबाला मिळणारी साथ अविस्मरणीय आहे. स्व.शंकररावजी कोल्हे साहेबांपासून जोडलेला आपला ऋणानुबंध हा तीन पिढ्या तितकाच अधिक घट्ट आहे. कार्यकर्ता हा आमच्यासाठी कुटुंबातील एक सदस्याप्रमाणे आहे त्यामुळे ज्येष्ठांचे मार्गदर्शन,अनेकांचा संघर्ष आणि युवकांच्या अपेक्षा हे सर्व लक्षात घेऊन केवळ निवडणुकी पुरते नाही तर भविष्यातील दूरदृष्टी जपून पुढे जाण्याचा आपला प्रयत्न आहे.

कितीही संघर्ष वाट्याला आला तरी क्षणभर विचार न करता निर्णय घेऊन पुढे जाणारातले आपण आहोत. मात्र सद्या नीटपणे विचार केला तर दहा वर्षे आपण भारतीय जनता पार्टीत निष्ठेने काम करत आहोत,पक्ष वाढीसाठी तुमचे सर्वांचे कष्ट आहेत. अनेकदा आपण जिथे अधिकार असेल तिथे भांडतो. जरी कधी कधी अन्याय झाला असेलही पण तरी आपण पक्षाला मजबूत ठेवण्यासाठी काम करणारे विश्वासू सहकारी आहोत. हीच आपली विश्वासाची वृत्ती आणि निष्ठा संघर्षाला न्याय देणारी ठरेल.

सत्ता ही सेवेसाठी म्हणून बघणे हा आपला पिंड आहे, जरी गेले काही काळ मतदारसंघात केवळ कागदोपत्री विकास असेल तरी प्रत्यक्षात खरा विकासाचा धागा विणण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना सत्तेतून सेवेची संधी देण्यासाठी आपली दखल पक्ष सर्वच पातळीवर आज घेतो आहे.

राज्यात महायुती असल्यामुळे पक्षाची जागा वाटपात अडचण झाली. यात आपल्याला विजयाची खात्री असतानाही जे काही नेत्यांसोबत झालेल्या चर्चेतून सध्या आपण पुढे जाणार आहोत ते त्याहून अधिक सन्मानाचे असेल कारण आपल्या आजवरच्या विश्वासाची ती पावती असणार आहे. आपली वृत्ती कुणाला धोका देऊन पुढे जाण्याची बिलकुल नाही त्यामुळे केंद्रीय स्तरावरील नेत्यांनी देखील विवेकभैय्यांच्या धाडसी आणि आश्वासक कार्याची दखल घेतली आहे योग्य ते पावले त्या दृष्टीने पडतील असा विश्वास आहे.

आपण सर्व एक कुटुंब आहोत. तुम्हा सर्वांची साथ इतकी अमाप आहे की कधीच त्यात अंतर येणार नाही. जे ही घडेल आपल्या मतदारसंघाचे अनेक मोठे प्रश्न आहेत स्व. शंकररावजी कोल्हे साहेबांचे स्वप्न पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळवणे हा दूरदर्शी निर्णय बळीराजाचे सोनेरी दिवस आनु शकतो त्या दृष्टीने काम करणे शक्य आहे, शेतकरी कर्जमाफी करून घेणे यासह राज्य आणि केंद्र स्तरावरील अनेक कामे मार्गी लावून मतदारसंघ अधिक सुजलाम सुफलाम करायचा आहे म्हणून विवेकभैय्यांना ऊर्जा देण्यासाठी जे घडेल ते चांगल्या भावनेने घडेल. यावेळी जे काही होईल ते सर्वांच्या हिताचे होईल.कधी कधी दोन पावले मागे येणे म्हणजे दहा पावले पुढे जाण्यासाठी घेतलेली भूमिका असते, तुम्ही सर्व साहेबांनी जोडलेले कार्यकर्तेरुपी कुटुंब आहात त्या शक्तीच्या जोरावर भविष्यात पुढे होणाऱ्या सर्व निवडणुका या आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन एकजुटीने पूर्ण ताकतीने लढू आणि जिंकू हा विश्वास ठेवत वाटचाल करूया..

कूछ पल के अंधेरे का अंत जल्द ही तय हैं,रखिए हौसला अब नजदीक सही समय हैं.!

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAmit Shahअमित शाहDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस