शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!

By वसंत भोसले | Updated: November 19, 2024 08:47 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: हिंदुत्वाच्या राजकारणाला प्रतिसाद मिळतो म्हणून भाजपने काँग्रेसच्या बंडखोरांनाच हाताशी धरून पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेच्या मदतीने शिरकाव करणे सुरू केले. नरेंद्र मोदी यांच्याकडे नेतृत्व आल्यावर कमकुवत झालेल्या काँग्रेसचे कंबरडेच मोडले.

वसंत भोसले,कोल्हापूर Maharashtra Election 2024: महाराष्ट्राच्या राजकारणावर अनेक दशके भरभक्कम प्रभाव राखून असलेल्या पश्चिम महाराष्ट्राने चौफेर प्रगती केली. सातत्याने सत्तेवर येणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या सरकारी धोरणांचा पुरेपूर लाभ उठवित यशवंतराव चव्हाण यांच्यापासून अनेक नेत्यांनी योगदान दिले. परिणामी आता ५८ विधानसभा मतदारसंघांत काँग्रेस विचाराचा अपराजित प्रभाव अद्यापि आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती काही ठिकाणांचा अपवाद सोडता पूर्वाश्रमीच्या काँग्रेसी नेतृत्वाच्या भरवशांवर  आव्हान निर्माण केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रावर काँग्रेस विचारांचा पगडा स्वातंत्र्यलढ्यापासूनच होता. शिवाय डाव्या विचारांकडे झुकलेल्या प्रतिसरकारच्या लढ्यानेही डावे पक्ष जनसामान्यांचा जनाधार मिळविण्यात यश मिळविले होते. शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचाराने चालणारे राजकारण सर्वव्यापी होते. शिवाय सत्यशोधकी चळवळीच्या माध्यमातून बहुजन समाजात मोठी जागृती झाली होती. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसला यशवंतराव चव्हाण, तुलसीदास जाधव, वसंतदादा पाटील, रत्नाप्पाण्णा कुंभार, काकासाहेब गाडगीळ, आदी नेत्यांचे नेतृत्व लाभले.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातून महाराष्ट्राची स्थापना झाली. यशवंतराव चव्हाण यांच्याकडे काँग्रेसचे नेतृत्व आले. महाराष्ट्राच्या विकासाची नियोजनबद्ध आखणी करण्यात त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. डाव्या विचारसरणीकडे झुकलेल्या बहुजन समाजातील अनेक शिक्षित तरुणांना त्यांनी आधुनिक महाराष्ट्राची उभारणी करावयास भागीदारी करण्याचे आवाहन केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि महाराष्ट्रातील पर्यायी विरोधी पक्ष ठरणारा शेतकरी कामगार पक्ष कमकुवत झाला.

सुमारे तीन दशके काँग्रेसच्या सत्तेला आव्हान देणारा पक्षच उभा राहू शकला नाही. मात्र, निवडक विरोधक असलेतरी ते तडाखेबंद भूमिका मांडणारी मंडळी होती. गणपतराव देशमुख, एन. डी. पाटील, दि. बा. पाटील ते उद्धवराव पाटील, केशव धोंगडे-पाटील यांच्यापर्यंत अनेकांनी महाराष्ट्राच्या विकासाला दिशा देताना चुकांवर नेमकेपणाने बोट ठेवले. १९९० नंतर वातावरण बदलत गेले. सहकारी चळवळीने गैरव्यवहाराने टोक गाठले काँग्रेसची बदनामी होऊ लागली.

औद्योगिकरणाबरोबर तयार झालेल्या मध्यमवर्ग, त्यांच्या आशा-आकांक्षा वाढल्या. दरम्यान, शेतीतील कुंठीत अवस्था आणि दर्जेदार शिक्षणाकडे केलेल्या दुर्लक्षाचा फटका काँग्रेसला बसू लागला. अनेक वर्षे भाकरी न परतल्याने नव्या नेतृत्वाला संधीच मिळेना. घराणेशाहीची सुरुवात झाली. काँग्रेस अडचणीत आली आणि गटबाजीनेही पोखरली.

दरम्यान, हिंदुत्वाच्या राजकारणाला प्रतिसाद मिळतो म्हणून भाजपने काँग्रेसच्या बंडखोरांनाच हाताशी धरून पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेच्या मदतीने शिरकाव करणे सुरू केले. नरेंद्र मोदी यांच्याकडे नेतृत्व आल्यावर कमकुवत झालेल्या काँग्रेसचे कंबरडेच मोडले. तरीदेखील आजही पुण्यातील काही जागा किंवा सांगलीची एकमेव जागा वगळली तर भाजप-मित्रपक्षांना पूर्वाश्रमीच्या काँग्रेसी नेतृत्वाच्या घराण्यांवर अवलंबून राहावे लागते आहे. अद्यापही काँग्रेस विचारांचा पगडा आहे.

या मतदारसंघात बंडखोरी 

१) इचलकरंजीत भाजप उमेदवार राहुल आवाडे यांच्याविरोधात अजित पवार गटाचे विठ्ठल चोपडे यांची बंडखोरी.

२) सांगलीत काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांच्याविरुद्ध जयश्री पाटील यांची बंडखोरी.

३) पाटणमध्ये उद्धवसेनेचे हर्षल कदम यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सत्यजित पाटणकर यांची बंडखोरी.

राजकारणाचा रंग बदल

स्वातंत्र्यलढ्यात पुणे आणि सातारा, सोलापूरचा झंझावात. काँग्रेसची खोल मुळे रुतण्यास स्वातंत्र्यसेनानींचे नेतृत्व कारणी होते.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात काँग्रेसवर प्रतिकूल परिणाम पण यशवंतराव चव्हाण यांच्या बेरजेच्या राजकारणाने सारा बहुजन समाज काँग्रेसच्या नेतृत्वाखाली भरभक्कम.

स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी चळवळीच्या माध्यमातून संस्थात्मक काम झाले. या संस्थांवर काँग्रेसचे नेतृत्व राहिले.

१९७७ नंतर काँग्रेसअंतर्गत दुफळीने काँग्रेसच्या फळीस धक्के बसले. यशवंतराव चव्हाण विरुद्ध वसंतदादा विरुद्ध  शरद पवार यांच्या लढाईने काँग्रेसअंतर्गत उभ्या भेगा पडल्या.

काँग्रेसच्या प्रभावामुळ‌े महाराष्ट्राला चार मुख्यमंत्री दिले. त्यापैकी पृथ्वीराज चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांचा अपवादवगळता यशवंतराव चव्हाण, वसंतदादा व शरद पवार यांनी अनेकवेळा महाराष्ट्राचे नेतृत्व केले.

काँग्रेसअंतर्गत संघर्ष वाढला मात्र, भाजप-शिवसेना युतीला त्याचा लाभ उठविता आला नाही. काँग्रेसच्या बंडखोरांनीच युती सरकार आल्यावर लाभ घेऊन भाजप-सेनेला पायघड्या घातल्या.

एकविसावे शतक सुरू झाले. सहकार क्षेत्र शेतकऱ्यांचे हित सांभाळण्यात कमी पडू लागले तसे शेतकरी संघटनांच्या आंदोलनाने उचल खाल्ली, परिणाम काँग्रेसविरोधी वातावरण तयार झाले.

काँग्रेसविरोधी वातावरण, हिंदुत्वाचे राजकारण, काँग्रेसची यावर बोटचेपी भूमिका आदींचा परिणाम झाला. २०१४ मध्ये केंद्रात भाजपला बहुमत मिळताच बंडखोर काँग्रेसवाल्यांची रसद युतीला मिळू लागली.

भाजप-सेना युतीला आजही पूर्वाश्रमीच्या काँग्रेसवाल्यांचा आधार घ्यावा लागतो. तेच आज महाआघाडी विरुद्ध आव्हान उभे करीत आहे. अपवाद पुणे शहराचा होऊ शकतो.

असे लढत आहेत राजकीय पक्ष

महाविकास आघाडी 

- काँग्रेस    १६- शरद पवार गट    ३१- उध्दवसेना    १०- मित्रपक्ष    ०१

महायुती 

- भाजप    २६- अजित पवार गट    १०- शिंदे सेना    २०- मित्रपक्ष    ०२

महाविकास आघाडी अनुकूल बाबी

- लोकसभा निवडणुकीतील यशामुळे उभारी.- लोकसभा निवडणुकीत मराठा, दलित, मुस्लिम मतांचे ऐक्य.- शरद पवार यांच्या यशामुळे नवी फेरमांडणी.- शेतकरी वर्गात नाराजी.

महाविकास आघाडी प्रतिकूल बाबी 

- आघाडीतील घटक पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव.

- आक्रमक भूमिका घेऊन प्रचार करण्यात मागे.

- काटाजोड लढतीमुळे अनेक नेते स्थानिक प्रचारात.

- पक्षातील गटबाजी, कुरघोड्या.

महायुती अनुकूल बाबी

- प्रचारात आक्रमकता, अनेक नेत्यांच्या सभा.

- राज्यात सरकार असल्याचा प्रभाव.

- अनेक योजना जाहीर, त्यांचा प्रचार.

- लाडकी बहीण योजनेचा लाभ- प्रभावी प्रचार.

महायुती प्रतिकूल बाबी  

- शेतमालाच्या दरावरून शेतकरीवर्ग नाराज.

- मराठा समाज-मराठा आरक्षणावरून नाराजी.

- शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यास नकार.

- महापूर आणि अतिवृष्टीने नुकसान भरपाई नाही.

भाजपची काट्याची टक्कर

पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणावरील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसचा प्रभाव मोडून काढण्यासाठी भाजप मित्र पक्षांच्या सहाय्याने प्रयत्न करीत आहे. महाविकास आघाडीने लोकसभेला दहापैकी सहा जागा जिंकल्या. पवार यांच्या प्रभावानेच हे यश मिळाले. त्याला काँग्रेसची साथ मिळाली. पुन्हा एकदा हीच लढत होत आहे. महायुतीने विशेषत: भाजपने प्रत्येक जिल्ह्यात काटा टक्कर होईल, असे वातावरण निर्माण केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील लढतींचा लक्ष्यवेध

बारामतीमध्ये शरद पवार कुटुंबीयांची सत्त्व परीक्षा. लोकसभेला ‘ताई’ आणि विधानसभेला ‘दादा’ असा निर्णय बारामतीकर घेणार का?

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना घेरण्याचा प्रयत्न भाजपकडून होतो आहे. भाजपचे अतुल भोसले यांचे पुन्हा एकदा आव्हान आहे !

आर. आर. आबांमुळे तासगावचे नाव सर्वमुखी झाले तेथे त्यांचा चिरंजीव रोहित याला आबांच्या विरोधात अयशस्वी लढती केलेल्या संजयकाका पाटील यांची झुंज !

कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसला पाच जागा घेऊन महाआघाडी भक्कम करणारे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाचा कस लागणार !

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस