शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: ...तर भाजपच्या ६ आमदारांवर घरी बसण्याची वेळ येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 06:44 IST

चार आमदार तिशीतील; सर्वपक्षीयातील १३ आमदार सत्तरी पार

- धनंजय वाखारे नाशिक : लोकसभा निवडणुकीत सत्तरी पार केलेल्या ज्येष्ठांना सक्तीची विश्रांती देणाऱ्या भाजपकडून महाराष्टÑ विधानसभा निवडणुकीतही तोच कित्ता गिरविला जाणार असेल तर ६ विद्यमान आमदारांना घरी बसण्याची वेळ येणार आहे. धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांनी लोकसभा निवडणुकीच्यावेळीच बंड पुकारत राजीनामा दिलेला आहे.२०१४ मध्ये निवडून आलेल्या सर्वपक्षीय १३ आमदारांनी आता सत्तरी पार केलेली आहे, तर ३५ आमदार साठीच्या वर आहेत. सांगोल्याचे सर्वात ज्येष्ठ आमदार ९२ वर्षीय गणपतराव देशमुख आणि चंदगडच्या संध्यादेवी कुपेकर यांनी स्वत:च निवडणूक रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेतला आहे.१०१ आमदार हे ५० ते ६० या वयोगटातील तर ९६ आमदार हे ४० ते ५० या वयोगटातील आहेत. ३५ आमदार हे ६० ते ७० या वयोगटातील आहेत. २० ते ३० या वयोगटातील अवघे चार तरुण आमदार निवडून आले होते. ३० ते ४० या वयोगटातील आमदारांची संख्या ४७ इतकी होती. मावळत्या विधानसभेतील १३ आमदारांनी आता वयाची सत्तरी ओलांडली आहे. त्यात भाजपचे ७, राष्ट्रवादीचे ३, कॉँग्रेसचे २ आणि शेकापच्या एका आमदाराचा समावेश आहे. विरोधी पक्षांमधील विधानसभेत सर्वाधिक वयोवृद्ध सदस्य असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे गणपतराव देशमुख यांनी आता नव्वदी पार केलेली आहे. तब्बल ११ वेळा निवडून येण्याचा विक्रम करणाऱ्या देशमुख यांनी आता स्वत:हून थांबण्याचा निर्णय घेतला आहे तर राष्ट्रवादीच्या चंदगडमधील आमदार संध्यादेवी कुपेकर यांनीही निवडणूक रिंगणात न उतरण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. कॉँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मधुकरराव चव्हाण तसेच राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी चालविली आहे.सत्तरी पार केलेले आमदारनाव                        मतदारसंघ       पक्ष       वयउदेसिंग पाडवी          शहादा        भाजप     ७१नाना श्यामकुळे         चंद्रपूर         भाजप     ७०मनोहर नाईक            पुसद         राष्ट्रवादी  ७७हरिभाऊ बागडे        फुलंब्री         भाजप    ७४छगन भुजबळ          येवला         राष्ट्रवादी   ७२सरदार तारासिंग       मुलुंड          भाजप     ८२मधुकर चव्हाण       तुळजापूर      कॉँग्रेस     ८२गणपतराव देशमुख  सांगोला        शेकाप    ९२पृथ्वीराज चव्हाण       कराड         कॉँग्रेस    ७३संध्यादेवी कुपेकर     चंदगड       राष्ट्रवादी   ७०शिवाजीराव नाईक   शिराळा        भाजप     ७४विलासराव जगताप     जत            भाजप     ७१

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेस