शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

Vidhan Sabha 2019 : ...तर आशीर्वादही निवडणुकीनंतरच देऊ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 12:23 AM

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019- आरेतील मेट्रो कारशेडवरून सरकारला नाणारसारखे झुकवू असे सूचक वक्तव्य शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते.

हितेन नाईकपालघर : आरेतील मेट्रो कारशेडवरून सरकारला नाणारसारखे झुकवू असे सूचक वक्तव्य शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्याच पार्श्वभूमीवर डहाणूच्या वाढवण बंदरासंदर्भात शिवसेनेची भूमिका काय? असा प्रश्न पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांना विचारल्यावर ‘नंतर बघू’ असे त्यांनी सांगितले. वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीसह प्राधिकरण बचाव संघर्ष समितीकडून या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. काहींनी तर आदित्य ठाकरेंना टिष्ट्वट करून ‘आम्ही तुम्हाला आशीर्वादही निवडणुकीनंतर देऊ’, असे बजावले आहे.युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गोरेगाव येथील मेट्रो कारशेडला तीव्र विरोध दर्शवला. डहाणू तालुक्यातील वाढवण बंदर उभारणीच्या हालचाली भाजप सरकारकडून सुरू झाल्या असतानाही सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. जनआशीर्वाद कार्यक्रमांतर्गत पालघरमध्ये आलेल्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना वाढवण बंदराबाबत शिवसेनेच्या भूमिकेबाबत थेट प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर त्यांनी ‘नंतर बघू’ असे वक्तव्य आल्याने किनारपट्टी भागातून संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करीत असल्याचेही प्राधिकरण बचाव समितीने आपल्या सोशल मीडिया ग्रुप वरून जाहीर केले आहे.पालघर विधानसभेचे शिवसेनेचे तत्कालीन आ. कृष्णा घोडा यांच्या निधनानंतर जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अमित घोडा यांच्या प्रचार सभेदरम्यान चिंचणी येथे झालेल्या एका जाहीर सभेत ‘वाढवण बंदराला शिवसेनेचा पूर्ण विरोध असेल’, असे जाहीर वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावरून केले होते. लोकांचा विरोध असेल तर हे बंदर शिवसेना कदापि होऊ देणार नाही. या बंदर विरोधातील आंदोलनात माझे सर्व शिवसैनिक सहभागी होतील, असेही त्यांनी जाहीर केले होते. या वक्त व्यावर विश्वास ठेवून पालघर विधानसभा मतदार संघातील किनारपट्टीवरील मतदारांनी शिवसेनेच्या पारड्यात आपली मते टाकून अमित घोडा यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले होते.मात्र, सध्या वाढवण बंदर उभारणीसाठी संरक्षण कवच ठरलेले ‘डहाणू पर्यावरण संरक्षण प्राधिकरण’ बरखास्त करण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. त्याबाबत वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती केंद्र सरकारच्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर आक्षेप घेणार आहे.हे प्राधिकरण हटविल्यास आपोआपच वाढवण बंदराचा मार्ग मोकळा होणार असल्याचा यात डाव असल्याचे वाढवण बंदर संघर्ष समितीचे म्हणणे आहे. अशावेळी सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाढवणवासीयांना दिलेल्या शब्दाप्रमाणे बंदराच्या आणि संरक्षण प्राधिकरण हटविण्याविरोधात सुरू असलेल्या कार्याला पाठिंबा दर्शवावा, अशी अपेक्षा स्थानिक व्यक्त करीत आहेत. अशावेळी आदित्य ठाकरेंचे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.>नवमहाराष्ट्र घडविण्यासाठी आशीर्वाद द्याबोईसर : महाराष्ट्र कर्ज , दुष्काळ व प्रदूषण मुक्त बरोबरच सुजलाम सुफलाम आणि हिरवागार असा नव महाराष्ट्र घडविण्यासाठी आशीर्वाद द्या असे भाविनक आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बोईसर येथे केले. आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा बोईसर येथे दोन तास उशिरा पोहचली तरी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक, युवा सैनिक व महिला उपस्थित होत्या. या वेळी ठाकरे यांनी संवाद साधताना लोकसभा निवडणुकीत आम्हाला ज्यांनी मतदान केले, त्या सर्वांचे आभार मानण्यासाठी तुमच्या भेटीसाठी आलो असल्याचे सांगितले. राजकीय भेदभाव दूर ठेवून नव महाराष्ट्र घडवायचा आहे, असे त्यांनी सांगून यात्रे दरम्यान सोनोग्राफी मशीन, खोळंबलेल्या रुग्णालयाबाबत त्वरित निर्णय घेऊन ते प्रश्न कसे सोडविले याची माहिती देऊन ही खरी शिवशाही असल्याचे सांगितले. मी शेतकरी, मच्छीमार, आदिवासी अशा विविध भागातील नागरिकांना भेटून स्थानिक प्रश्न व समस्या जाणून निवेदने स्वीकारली आहेत.नवमहाराष्ट्र घडवण्यासाठी आपण यापुढे देखील दरवर्षी अशा प्रकारची यात्रा करून राज्याच्या वेगवेगळ्या भागातील समस्या जाणून घेणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. या वेळी सार्वजनिक बांधकाम व आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, स्थानिक खासदार, आमदार शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.>बेरोजगारीमुक्त, प्रदूषणमुक्त महाराष्ट्र मला घडवायचायवाडा : बेरोजगारीमुक्त, दुष्काळमुक्त तसेच प्रदूषणमुक्त महाराष्ट्र मला घडवायचा असून जन आशीर्वाद यात्रेनिमित्त मी महाराष्ट्रभर फिरत असताना जनता माझ्यासमोर वेगवेगळ्या समस्या मांडत आहे. जनतेचा माझ्यावर विश्वास असल्यामुळेच या यात्रेदरम्यान मला भरभरून आशीर्वाद मिळतो आहे, असे उद्गार जनआशीर्वाद यात्रे निमित्त वाडा येथे आलेले युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी काढले. जन आशीर्वाद यात्रेनिमित्त आदित्य ठाकरे यांचे वाडा येथे आगमन होताच शिवसैनिकांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. वाड्यातील खंडेश्वरी नाका येथे त्यांनी जनतेशी संवाद साधला. ही जन आशीर्वाद यात्रा नसून माझी तीर्थयात्रा आहे, सर्व समाजाला बरोबर घेऊन नवा महाराष्ट्र घडवायचा आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.दिवसभर सुरू असलेल्या पावासातही शिवसैनिक तसेच युवासेना कार्यकर्त्यांचा उत्साह कायम असल्याचे दिसून आले. यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे प्रथमच वाड्यात आल्याने त्यांच्या स्वागतासाठी शिवसेना, युवासेना, युवती सेना, महिला आघाडी व अंगिकृत संघटनांचे पदाधिकारी अत्यंत उत्साहात होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, हातमाग महामंडळाचे अध्यक्ष व ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, माजी मंत्री सचिन अहिर, खा. राजेंद्र गावित, संपर्क प्रमुख आ. रवींद्र फाटक, आ. शांताराम मोरे, आ. अमित घोडा, माजी आमदार पांडुरंग बरोरा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश गंधे, उपस्थित होते.>गावित, तरे, घोडा यांचे फोटो यात्रेतील बॅनरवरून गायबबोईसर : जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने बोईसर येथील कार्यक्रम ठिकाणी तसेच परिसरात सर्वत्र बॅनर लावण्यात आले होते. यातील काही बॅनरवर शिवसेनेत नव्याने प्रवेश केलेले आ. विलास तरे काही ठिकाणी खा. राजेंद्र गावित आणि पालघरचे आ. अमित घोडा यांची छायाचित्रे दिसलीच नाहीत. त्यामुळे यासंदर्भात चर्चा सुरू होती. या यात्रेच्या निमित्ताने दोन महिन्यांपासून बोईसर - पालघर आणि बोईसर - तारापूर या रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांची काही प्रमाणात डागडुजी करण्यात आली. तर एरवी सिडको ते ओसवाल रस्त्यावर नेहमी दिसणारा प्रचंड कचरा उचलून परिसराची साफसफाई करण्यात आली.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019