शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

Vidhan Sabha 2019: दिलेल्या शब्दावर ठाम राहता येत नसेल तर भाजपाने आत्मपरीक्षण करावे, शिवसेनेचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 13:21 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - विधानसभा निवडणुकीसाठीचा भाजपा आणि शिवसेनेमधील जागावाटपाचा गुंता दिवसेंदिवस जटील होत चालला आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठीचाभाजपा आणि शिवसेनेमधील जागावाटपाचा गुंता दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. त्यातच जागावाटपामध्ये नमते घेण्यास शिवसेनेने नकार दिल्याने युतीची घोषणा लांबली आहे. दरम्यान, दिलेल्या शब्दावर ठाम राहता येत नसेल तर भाजपाला आत्मपरीक्षणाची गरज आहे. असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.  जागावाटपाबाबत दिवसेंदिवस लंबत चाललेले चर्चेचे गुऱ्हाळ आणि 2014 प्रमाणेच यावेळीही जागावाटपाचे एकापाठोपाठ एक फॉर्म्युले समोर येत असल्याने शेवटच्या क्षणी युती तुटणार  अशी चर्चा राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्ये सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाला चार शब्द सुनावले. ''विधानसभेच्या जागावाटपाबाबत लोकसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांनी एक फॉर्म्युला ठरवला होता. समसमान जागावाटपाचे सूत्र तेव्हा ठरले होते. त्या फॉर्म्युल्यावर आम्ही ठाम आहोत. आता भाजपाला जर आपल्या दिलेल्या शब्दावर ठाम राहता येत नसेल तर भाजपाला आत्मपरीक्षणाची गरज आहे,'' असा टोला राऊत यांनी लगावला. ''हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. येथे दिलेल्या शब्दाला किंमत आहे. युतीमध्ये आम्ही अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणींचा काळ पाहिलाय. प्रमोद महाजन यांनाही पाहिलंय. हे तिन्ही नेते शब्दाला पक्के होते.'' असे सांगत संजय राऊत यांनी भाजपाच्या सध्याच्या नेतृत्वावर अप्रत्यक्षरीत्या टीका केली.

दरम्यान,  भाजपासोबत सत्तेत जाऊन आम्ही चूक केल्याचं विधान संजय राऊत यांनी काल केले होते. '2014 साली शिवसेनेतील काही नेत्यांना वाटत होते आपण सत्तेत गेलो पाहिजे पण माझं यावर मत वेगळं होतं. आम्ही सत्तेत गेलो नसतो तर चित्र वेगळं असतं',  मागील 5 वर्ष राज्यात शिवसेना-भाजपाची सत्ता होती. सुरुवातीच्या काळात विरोधी पक्षात बसलेली शिवसेना अवघ्या 3 महिन्यात सत्ताधारी बाकांवर जाऊन बसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्यासह संपूर्ण पक्ष सत्ताधारी पक्षात गेला. शिवसेनेच्या या निर्णयावर अनेकांनी टीकाही केली होती. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाSanjay Rautसंजय राऊत