शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

Vidhan Sabha 2019: पश्चिम महाराष्ट्र- बालेकिल्ल्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादी अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 03:20 IST

भाजपचे सर्वच पक्षांसमोर कडवे आव्हान

- वसंत भोसले कोल्हापूर : पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील ५८ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वच पक्षांसमोर आव्हान उभे केले आहे. विशेष म्हणजे हा कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचा गड राहिला आहे. त्यांच्या पक्षातील अनेक मोहरे लढण्यापूर्वीच भाजपला शरण गेल्याने दोन्ही कॉँग्रेस पक्ष अडचणीत सापडले आहेत.पश्चिम महाराष्ट हा सधन विभाग मानला जातो. सहकार हा येथील राजकारणाचा कणा असल्याने नेहमीच कॉँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, राष्टÑवादी कॉँग्रेसची स्थापना झाल्यानंतर कॉँग्रेसची पीछेहाट झाली. गतनिवडणुकीत दोन्ही कॉँग्रेसनी स्वतंत्र निवडणुका लढविल्या. त्यात राष्ट्रवादीला सोळा तर कॉँग्रेसला केवळ सात जागा मिळाल्या होत्या. येत्या निवडणुकीत त्याहून वाईट स्थिती होईल, अशी शक्यता आहे.सलग दोन्ही लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसने केवळ तीन जागा लढवून त्या सर्व गमावल्या. पश्चिम महाराष्टÑातून कॉँग्रेसचा एकही खासदार नाही. राष्टÑवादीने छोटा गड का असेना पुणे आणि साताºयात राखला आहे. याउलट भाजपने आपली ताकद वाढविली आहे. राष्टÑवादी कॉँग्रेससाठी सोलापूर, सातारा आणि सांगली हे जिल्हे सातत्याने दोन-चार आमदार देणारे आहेत. त्यापैकी जयंत पाटील, सुमनताई पाटील, हसन मुश्रीफ, शशिकांत शिंदे, सत्यजित पाटणकर, मकरंद पाटील आदी समर्थक उमेदवारवगळता दमछाकच होणार आहे. हीच अवस्था काँग्रेसची आहे. भाजपला पुणे शहरातून पुन्हा कौल मिळेल; असे वातावरण आहे. जिल्ह्यातील तेरा जागांवरही या पक्षाने मातब्बर उमेदवार देण्याची तयारी केली आहे. शिवसेनेकडे तेरा आमदार आहेत, स्वतंत्रपणे लढले तरी सेना स्पर्धेत राहणार आहे. भाजप-सेना युती झाली तर मात्र कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडीचा टिकाव लागणे कठीण, अशी परिस्थिती तरी सध्या आहे.एमआयएमशाी फारकत घेतल्याने वंचित आघाडीचा फारसा प्रभाव जाणवणार नाही.प्रचाराचे मुद्देमहापुराने कृष्णा आणि भीमा नदीच्या काठावर हाहाकार उडाला असला तरी पश्चिम महाराष्टÑाच्या पूर्वेकडीलच्या दुष्काळी पट्ट्यातील पाणीप्रश्न गंभीर आहे. तो यशस्वीपणे हाताळण्यात फडणवीस सरकारलाही यश आलेले नाही.साखर कारखाने अनेक कारणांनी अडचणीत आल्याने ऊसकरी शेतकरी संकटात आहे. त्याला मदत करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात सरकारला अपयश आले आहे, हा मुद्दा प्रचारात येऊ शकतो.मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आणि लिंगायत समाजाला ‘स्वतंत्र धर्मा’ची मान्यता या प्रश्नावर समाधानकारक तोडगा निघाला नाही, त्याची नाराजी राहणार आहे.राष्टÑवादाच्या मुद्द्यावरच मोदींसाठी मतदान करा, याच्याआधारेच भाजप-सेना प्रचारावर भर देण्याची शक्यता आहे, अन्यथा सांगण्यायोग्य काही मुद्देच नाहीत.पश्चिम महाराष्ट्रातील सध्याचे बलाबलएकूण जागा- ५८भाजप-२१शिवसेना-१३काँग्रेस-७राष्ट्रवादी-१६इतर-१

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस