शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: ६८ आमदार हॅट्ट्रिकसाठी उतरणार मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 03:40 IST

रंगतदार लढती; मंत्र्यांना रोखण्यासाठी विरोधकांचीही जोरदार मोर्चेबांधणी

- पोपट पवार कोल्हापूर : महाराष्ट्र विधानसभेतील एक-दोन नव्हे, तर तब्बल ६८ विद्यमान आमदार विधानसभेच्या निवडणुकीत हॅट्ट्रिक करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे या आमदारांची हॅट्ट्रिक विरोधक रोखणार की, सलग तीन वेळा निवडून येण्याचा विक्रम संबंधित आमदार आपल्या नावावर करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. विशेष म्हणजे या आमदारांमध्ये काही मंत्र्यांचाही समावेश असल्याने त्यांच्या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.महाराष्ट्राच्या विधानसभेत २८८ आमदार असून, यापैकी ६८ आमदार सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. यातील तीन-चार आमदार सोडले, तर बहुतांश आमदारांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यामुळे या आमदारांनी हॅट्ट्रिक करण्यासाठी कंबर कसली आहे. विशेष म्हणजे या हॅट्ट्रिकसाठी तयारी करणाºया आमदारांमध्ये भाजपचे सर्वाधिक २४ आमदार आहेत, तर शिवसेनेचे १६, काँग्रेसचे १२, राष्ट्रवादीचे पाच, बहुजन विकास आघाडी, भारिप, अपक्ष, व शेकाप अशा प्रत्येकी एका आमदाराचा समावेश आहे. विशेष म्हणजे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीला रामराम करीत भाजप-शिवसेनेचा झेंडा हाती घेतलेले सहा आमदारही हॅट्ट्रिकसाठी निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहेत.ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा विजयश्री खेचून आणली आहे. गत निवडणुकीत परळीच्या रणांगणात भाऊबंदकीचा सामना चांगलाच रंगला होता. त्यात पंकजा यांनी बंधू धनंजय मुंडे यांचा पराभव करीत परळीवरचे वर्चस्व राखले होते. यंदा मात्र, पंकजा यांची हॅट्ट्रिक रोखण्यासाठी राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांना मोठी रसद पुरविल्याने हा सामना चांगलाच रंगणार आहे. तिकडे विलासरावांच्या माघारी बाभूळगावची गढी काहीशी ढासळली असली तरी विधानसभेला अमित देशमुख यांनी सलग दोन वेळा लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून बाजी मारत काँग्रेसचे अस्तित्व टिकवून ठेवले आहे. यंदा मात्र, अमित देशमुख यांची हॅट्ट्रिक रोखण्यासाठी भाजपने देशमुखांचे पारंपरिक विरोधक शिवाजीराव पाटील-कव्हेकर यांचे पुत्र अजित यांनाच मैदानात उतरविण्याची खेळी सुरूकेली आहे. त्यामुळे अमित देशमुख हॅट्ट्रिक करणार की, भाजप बाभूळगावच्या गढीवरील काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात आणणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एरव्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सतत मैदानात उतरून राष्ट्रवादीची बाजू सावरणारे कळवा-मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनाही यंदा आपले अस्तित्व पणाला लावावे लागणार आहे. युती झाली तर ऐनवेळी भाजपकडून गणेश नाईक यांनाच आव्हाडांची हॅट्ट्रिक रोखण्यासाठी आव्हाडांच्या होमपिचवर धाडले जाण्याची शक्यता आहे. कर्जत-जामखेडचे रणांगण रोहित पवारांच्या एन्ट्रीमुळे चांगलेच चर्चेत आले असून, विद्यमान मंत्री राम शिंदे यांची हॅट्ट्रिक रोखण्यासाठी अख्खी राष्ट्रवादी कामाला लागली आहे. भाजपनेही राम शिंदे यांच्या मागे मोठी रसद पुरविल्याचे चित्र आहे. शिवसेना नेते व राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीच्या पट्ट्यात ‘पुरंदर’मधून सलग दोन वेळा विजय मिळविला आहे. लोकसभेवेळी त्यांनी थेट पवार परिवाराला अंगावर घेतल्याने अजित पवार यांनी शिवतारेंची हॅट्ट्रिक रोखण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. त्यामुळे पुरंदरच्या ऐतिहासिक मैदानात शिवसेना बारामतीकरांना पुन्हा पाणी पाजणार की, अजित पवार आपला शब्द खरा करणार, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.या बड्या नेत्यांची हॅट्ट्रिकसाठी धडपडपंकजा मुंडे (भाजप), जयकुमार रावल (भाजप), अनिल बोंडे (भाजप), पंकज भुजबळ (राष्ट्रवादी), राजकुमार बडोले (भाजप), विजय शिवतारे (शिवसेना), बाळा भेगडे (भाजप), रवींद्र वायकर (शिवसेना) , राम कदम (भाजप), क्षितिज ठाकूर (बविआ), जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी), राम शिंंदे (भाजप), अमित देशमुख (काँग्रेस), चंद्रदीप नरके (शिवसेना), राजेश क्षीरसागर (शिवसेना), सुजित मिणचेकर (शिवसेना), सुरेश हाळवणकर (भाजप).पक्षांतर केलेल्या सहा आमदारांनाही हॅट्ट्रिकचे वेधअब्दुल सत्तार( शिवसेना), भाऊसाहेब कांबळे (शिवसेना), विलास तरे (शिवसेना), जयकुमार गोरे (भाजप), संदीप नाईक (भाजप), निर्मला गावित (शिवसेना).भाजप- २४, शिवसेना- १६, काँग्रेस- १२, राष्ट्रवादी- ५, बविआ-१, भारिप-१, अपक्ष- १, शेकाप- १, पक्षांतर केलेले- ६.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस