शहरं
Join us  
Trending Stories
1
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
2
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
3
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
4
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
5
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
6
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
7
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
8
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
9
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
10
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
11
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
12
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
13
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
14
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
15
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन
16
Nashik Crime: 'कोणी लागत नाही नादी', पोलिसांना आव्हान माजी नगरसेवक पवन पवारविरोधात गुन्हा
17
ट्रम्प यांच्या भाषणावेळी इस्रायली संसदेत घोषणाबाजी, 'नरसंहार'चे पोस्टर फडकावले, गाझा समर्थक दोन खासदारांना बाहेर काढले
18
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
19
अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार संग्राम जगताप यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणाले?
20
IND vs WI 2nd Test Day 4 Stumps : मॅच टीम इंडियाचीच! पण चौथ्या दिवशी वेस्ट इंडिज टीम जिंकली

महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षा १९ जानेवारीला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 18:47 IST

विद्यार्थ्यांना येत्या ८ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने परीक्षा अर्ज भरता येणार आहेत..

ठळक मुद्देडी.एड्., बी.एड्.पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सुमारे ९० टक्क्यांनी घटचालू शैक्षणिक वर्षात राज्य शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुमारे ५ हजार शिक्षकांची भरतीशाळांमध्ये शिक्षक पदावरील नियुक्तीसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य

पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे (महाटीईटी-२०१९ ) वेळापत्रक प्रसिध्द झाले असून येत्या १९ जानेवारी २०२० रोजी राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर टीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना येत्या ८ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने परीक्षा अर्ज भरता येणार आहेत, असे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.राज्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया काही वर्षांपासून रखडली होती. परिणामी डी.एड्., बी.एड्.पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सुमारे ९० टक्क्यांनी घट झाली. तसेच टीईटी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नाही. त्यामुळे या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमीच होती.मात्र,चालू शैक्षणिक वर्षात राज्य शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुमारे ५ हजार शिक्षकांची भरती केली.भरती प्रक्रिया सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याची शास्वती वाटू लागली आहे.यामुळे यंदा टीईटी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होईल,अशी शक्यता परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.दत्तात्रय जगताप म्हणाले,इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी पर्यंतच्या सर्व व्यवस्थापन,सर्व परीक्षा मंडळ ,सर्व माध्यम ,अनुदानित,विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळांमध्ये शिक्षक पदावरील नियुक्तीसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. परीक्षा परिषदेतर्फे जानेवारी २०२० मध्ये घेतल्या जाणा-या परीक्षेसाठी ८ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांकडून नलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.तसेच १९ जानेवारी रोजी सकाळीच्या सत्रात व दुपारच्या सत्रात टीईटी परीक्षेचा पहिला व दुसरा पेपर घेतला जाईल.--------------मागील टीईटी परीक्षेस १ लाख ७३ हजार विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. मात्र, यंदा पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती सुरू झाली. त्यामुळे टीईटी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होईल.जानेवारी २०२० मध्ये होणाऱ्या परीक्षेस सुमारे अडीच लाखापर्यंत विद्यार्थी बसण्याची शक्यता आहे.- दत्तात्रय जगताप,अध्यक्ष,परीक्षा परिषद,महाराष्ट्र राज्य------  टीईटी परीक्षेचे वेळापत्रक ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी : ८ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर प्रवेशपत्राची ऑनलाईन प्रिट काढण्याचा कालावधी : ४ जानेवारी ते १९ जानेवारी २०२०टीईटी परीक्षा, पेपर क्रमांक - १  :  सकाळी १०.३० ते १.०० (१९ जानेवारी)टीईटी परीक्षा, पेपर क्रमांक - २ : दुपारी २ ते ४.३० (१९ जानेवारी)-------------------------

टॅग्स :PuneपुणेTeacherशिक्षकEducationशिक्षणSchoolशाळाcollegeमहाविद्यालय