शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

Devendra Fadnavis : भाजपाच्या मुंबईतील विजयोत्सवात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह बडे नेते अनुपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 15:09 IST

सत्ता मिळाल्यानंतरही भाजपाच्या सेलिब्रेशनमध्ये अपेक्षित गाजावाजा दिसला नाही

Devendra Fadnavis Maharashtra: १०-१२ दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर अखेर गुरूवारी भाजपाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आणि शिंदे उपमुख्यमंत्री होणार हे त्यांच्या शपथविधीच्या काही तास आधीपर्यंत लोकांना समजत होते. मात्र शपथविधीच्या काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वांनाच चकित केले. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री न केल्यामुळे देवेंद्र फडणवीस नाराज असल्याच्या बातम्या आल्या. पण भाजपाचे वरच्या फळीत नेते अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्यासह भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी या निर्णयाला देवेंद्र फडणवीस यांचा त्याग आणि समर्पण म्हटले. असे असले तरी भाजपाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात देवेंद्र फडणवीसांसह अनेक बडे अनुपस्थित नसल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या.

भाजपाच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा काल शपथविधी झाला. एकनाथ शिंदे यांच्या गटाला भाजपाने बाहेरून पाठिंबा देणे ही बाबत साऱ्यांनी राजकीय चाणक्यनीती असल्याचे म्हटले. पण देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदी राहण्याचे पक्षश्रेष्ठींची आदेश आल्यानंतर सारं काही बिनसलं. भाजपातील आमदारांचा एक मोठा गट फडणवीसांबाबतच्या निर्णयावर खुश नसल्याचे दिसले. देवेंद्र फडणवीस हे देखील पदाची शपथ घेताना फारसे खुश नव्हते असे त्यांचा चेहराच सांगून गेला. अशा परिस्थितीत आज भाजपाकडून सत्तास्थापनेचा विजयोत्सव मुंबईच्या प्रदेश कार्यालयात साजरा करण्यात आला. त्यात राज्याचे नवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, गिरीश महाजन, प्रसाद लाड यांसारखे नेते अनुपस्थित असल्याने साऱ्यांनाच मोठा धक्का बसला.

मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल

मुंबई भाजपा कार्यालयात सत्तास्थापनेचा जल्लोष सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांचा कट-आऊट हातात घेऊन कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. या जल्लोषावेळी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भावना व्यक्त केल्या. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा नेता हा त्यागासाठी नेहमीच लक्षात राहिल असे ते म्हणाले. तसेच, मुंबईला काही घराणी आपली जहागीर समजतात. पण मुंबई पालिकेच्या निवडणुकीत जनता राज येईल आणि घराणेशाहीचे राज्य संपुष्टात येईल, असा विश्वास व्यक्त करत उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. यासोबतच भाजपा मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी, 'विधानसभा तो झांकी है, मुंबई महापालिका बाकी है', अशा घोषणाही दिल्या. यावेळी 'पद का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन पर चढते जाना' असे फलक घेऊन कार्यकर्ते प्रदेश कार्यालयात दिसले. देवेंद्र फडणवीस यांनी पक्षादेश मानत सर्वोच्च पदाचा त्याग करून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले याचे साऱ्यांनीच कौतुक केले.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmit Shahअमित शाहBJPभाजपा