शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

Coronavirus: राज्याचा रिकव्हरी रेट ९५.७६ टक्के; मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ७२० दिवसांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 10:21 PM

Coronavirus: नवीन कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण पुन्हा वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबई: राज्यातील जनतेसाठी दिलासादायक वृत्त आहे. नवीन कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण पुन्हा वाढल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत १० हजार ३७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९५.७६ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण ८ हजार ९१२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 8912 new corona cases and 257 deaths in last 24 hours)

मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यांत ८ हजार ९१२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत २५७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच १० हजार ३७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५७ लाख १० हजार ३५६ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर १.९७ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण १ लाख ३२ हजार ५९७ इतकी आहे.

मुंबईकरांना दिलासा

मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ६९६ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत ७९० रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत १३ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १५ हजार २७९ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे १४ हजार ७५१ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.९ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालाावधी ७२० दिवसांवर गेला आहे. 

दरम्यान, राज्यामध्ये एकूण ३ कोटी ९३ लाख १२ हजार ९२० कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५९ लाख ६३ हजार ४२० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात ८ लाख ०६ हजार ५०६ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, ४ हजार ६९५ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या