Maharashtra reports 63,294 new corona Virus cases; 349 deaths today 24 hours | Coronavirus in Maharashtra: मोठी उसळी! राज्यात पहिल्यांदाच कोरोना रुग्णसंख्या 63 हजारावर; 349 मृत्यू

Coronavirus in Maharashtra: मोठी उसळी! राज्यात पहिल्यांदाच कोरोना रुग्णसंख्या 63 हजारावर; 349 मृत्यू

राज्यात काही दिवसांत कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री वेगवेगळ्या स्तरावर बैठका घेत असून लॉकडाऊनची रुपरेषा ठरविण्यात व्यस्त आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर आजची नवीन कोरोनाबाधितांची (Corona Virus) संख्या भयावह आहे. राज्यात पहिल्यांदाच नव्या कोरोना रुग्णांच्या आकड्याने 63000 चा पल्ला पार केला आहे. (Maharashtra reports 63,294 new #COVID19 cases, 34,008 recoveries and 349 deaths in the last 24 hours)

Lockdown: लॉकडाऊनची तयारी! टास्क फोर्सची बैठक संपत नाही तोच मुख्यमंत्र्यांची सचिवांसोबत बैठक


राज्यात गेल्या 24 तासांत 63,294 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर 349 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज 34,008 बरे झाले झाले आहेत. या रुग्णांमुळे एकूण रुग्णसंख्या ही 34,07,245 झाली आहे. एकूण मृतांचा आकडा 57,987 झाला असून राज्यात सध्या 5,65,587 रुग्ण उपचार घेत आहेत. 
तर मुंबईमध्ये कोरोनाचे 9,989 नवे रुग्ण सापडले आहेत. नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 7,201 नवे कोरोनाबाधित. 63 मृत्यू. 3,240 बरे झाले. राज्यात आज तब्बल 7883 रुग्णांची वाढ झाली आहे.  

Corona Task Force: रुग्णांची 6 मिनिटे वॉक टेस्ट घ्या, मगच दाखल करा; टास्क फोर्सकडून महत्वाचे सल्ले


कालची आकडेवारी काय...
राज्यात काल 55,411 नवे कोरोनाबाधित सापडले होते. 309 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर मुंबईत हा आकडा 9327 एवढा होता. पुणे शहरातील कोरोनाचा उद्रेक आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने मागील शनिवारपासून कडक निर्बंध जाहीर केले आहे. दिवसा जमावबंदी तर सायंकाळी ६ नंतर कडक संचारबंदी लागू आहे. मात्र, आता त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. गेल्या काही दिवसांत ३६ टक्क्यांवर पोहचलेला पॉझिटिव्हिटी रेट आता कमी होऊ लागला आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. सौरभ राव यांनी दिलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे. 

Lockdown: लॉकडाऊनचा निर्णय उद्यावर; उद्धव ठाकरे, अजित पवारांमध्ये सकाळी महत्वाची बैठक होणार

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Maharashtra reports 63,294 new corona Virus cases; 349 deaths today 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.