शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Corona Virus: राज्यात कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठी वाढ; लॉकडाऊनची टांगती तलवार?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 9:08 PM

big increase in corona virus Patient in Maharashtra: मुंबईनंतर एकट्या अमरावती जिल्ह्यात आज 498 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. कोरोनाचा वाढता आकडा मोठे संकट घेऊन येण्याची शक्यता आहे.

राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाढू लागले आहेत. मुंबईनंतर एकट्या अमरावती जिल्ह्यात आज 498 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. कोरोनाचा वाढता आकडा मोठे संकट घेऊन येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यात लॉकडाऊन लावणार नाही, परंतू निर्बंध घालावे लागतील असा इशारा दिला आहे. स्थानिक पातळीवर कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. (Maharashtra reports 4,787 new COVID-19 cases, 3,853  discharges, and 40 deaths in the last 24 hours, as per State Health Department.)

राज्यात आज दिवसभरात 4,787 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. मंगळवारी हा आकडा 3,663 एवढा होता. यामध्ये आज जवळपास 1100 रुग्णांची वाढ झाली आहे. तर 40 जणांचा मृत्यू झाला आहे. 3,853  जण बरे झाले आहेत, असे आरोग्य खात्याने सांगितले. राज्यात एकूण 20,76,093 कोरोनाबाधित सापडले आहेत. यापैकी 19,85,261 बरे झाले आहेत. सध्या 38,013 रुग्ण उपचार घेत आहेत. मृतांचा आकडा 51,631 झाला आहे. मुंबई, ठाणे, पुण्यामध्ये सर्वाधिक रुग्ण उपचार घेत आहेत. अनुक्रमे 4530, 4681, 7509 रुग्ण आहेत. राज्यातील मृत्यूदर 2.49 टक्के एवढा आहे.

मुंबईत आज 721 रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या दोन महिन्यातील ही सर्वाधिक वाढ आहे. 721 रुग्णांपैकी 82 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत. त्यामुळे बरचेसे रुग्ण हे होमक्वॉरन्टीन आहेत. 98 टक्के वाढलेल्या केसेस या हायराईज सोसायटीमधील आहेत. झोपडपट्टी किंवा दाटीवाटीच्या भागातून जास्त रुग्ण नाहीत.  

उद्धव ठाकरे काय म्हणालेले...

सर्व व्यवहार सुरू झाले आहेत, निर्बंध शिथिल केले आहेत. परंतु कोरोना संपला असे सगळे वागत आहेत, ज्येष्ठ नागरिकांना धोक्यात आणतो आहोत. कोरोनाला अटकाव करण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन हवा की थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे हे जनतेने ठरवायचे आहे, असे सांगतानाच नियम  पाळणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. यावेळी ठाकरे यांनी अनेक सूचना केल्या.

पुन्हा कडक निर्बंध- लग्नसमारंभ, लोकांच्या गाठीभेटी, पार्ट्या व इतर सामाजिक कार्यक्रमात आरोग्यविषयक नियम पाळले जात नसतील तर कारवाई होणार- उपाहारगृह, हॉटेल्समध्ये नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आल्यास परवाना होऊ शकतो रद्द- ज्या विवाह किंवा इतर समारंभात मास्क व इतर नियम पाळलेले दिसणार नाहीत त्या हॉल्स किंवा सभागृहांचे परवाने रद्द होणार- कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमासाठी आता पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल- सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंचे पालन होत नसल्यास कारवाई होणार

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या