Coronavirus: किंचित दिलासा! राज्यात गेल्या २४ तासांत ४,६५४ नव्या रुग्णांची नोंद; ३,३०१ जण कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 09:57 PM2021-08-27T21:57:20+5:302021-08-27T21:59:13+5:30

Coronavirus: मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी १७४७ दिवसांवर गेला आहे. 

maharashtra reports 4654 new corona cases and 170 deaths in last 24 hours | Coronavirus: किंचित दिलासा! राज्यात गेल्या २४ तासांत ४,६५४ नव्या रुग्णांची नोंद; ३,३०१ जण कोरोनामुक्त

Coronavirus: किंचित दिलासा! राज्यात गेल्या २४ तासांत ४,६५४ नव्या रुग्णांची नोंद; ३,३०१ जण कोरोनामुक्त

googlenewsNext
ठळक मुद्देगेल्या २४ तासांत राज्यात एकूण ४ हजार ६५४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंदयाच कालावधीत १७० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यूगेल्या २४ तासांत ३ हजार ३०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले

मुंबई: राज्यातील जनतेसाठी काहीसे चिंताजनक असे वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होताना पाहायाला मिळत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ३ हजार ३०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९७.०२ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ४ हजार ६५४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 4654 new corona cases and 170 deaths in last 24 hours)

“वैयक्तिक टीका कराल, तर जशास तशी रिॲक्शन मिळेल”; शिवसेना नेत्यांचा राणेंना इशारा

मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात ४ हजार ६५४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत १७० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ३ हजार ३०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ५२ हजार १५० रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण ५१ हजार ५७४ इतकी आहे. 

“PM मोदींना बाबरीसाठी लढणारा अन्सारी प्रिय वाटतो, पण राम मंदिरासाठी...”; तोगडियांचा टोला

मुंबईकरांच्या चिंतेतही काहीशी भर 

गेल्या सलग अनेक दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या १० हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत केवळ ३६४ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत २१४ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत ५ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १५ हजार ९६८ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे २ हजार ८८० उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.०४ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालावधी १७४७ दिवसांवर गेला आहे. 

दरम्यान, आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ३२ लाख ५६ हजार ०२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ४७ हजार ४४२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच राज्यात २ लाख ९२ हजार ७३३ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, २ हजार ३३७ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या राज्यातील पुणे, ठाणे, सातारा, सांगली आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक अ‍ॅक्टिव्ह करोना रुग्ण आहेत.
 

Web Title: maharashtra reports 4654 new corona cases and 170 deaths in last 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.