Maharashtra Corona Updates: महाराष्ट्रासाठी मोठा दिलासा! आज ६० हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 21:04 IST2021-05-09T21:01:52+5:302021-05-09T21:04:00+5:30
Maharashtra Corona Updates: महाराष्ट्राच्या कोरोना लढ्याला यश येत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण आज राज्यात नव्या कोरोना रुग्णांमध्ये घट झाली आहे.

Maharashtra Corona Updates: महाराष्ट्रासाठी मोठा दिलासा! आज ६० हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त
Maharashtra Corona Updates: महाराष्ट्राच्या कोरोना लढ्याला यश येत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण आज राज्यात नव्या कोरोना रुग्णांमध्ये घट झाली आहे. तर कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ४८ हजार ४०१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. पण दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आज तब्बल ६० हजार २२६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. (Maharashtra records 48,401 fresh COVID-19 cases, 60,226 patient discharges)
मुंबईकरांच्या कोरोना लढ्याला यश, रुग्ण बरं होण्याचा दर ९१ टक्क्यांवर!
राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ८६.४ टक्के इतकं झालं आहे. यात मुंबईनं लक्षवेधी कामगिरी केल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील कोरोना रुग्ण बरं होण्याचं प्रमाण आता ९१ टक्क्यांवर पोहोचलं आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचं प्रमाण कमी होताना दिसत आहे. राज्यात आतापर्यंत ४४ लाख ७ हजार ८१८ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. राज्यात आज ५७२ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के इतका आहे.
Maharashtra records 48,401 fresh COVID-19 cases, 60,226 patient discharges, and 572 deaths, as per State Health Department
— ANI (@ANI) May 9, 2021
Active cases: 6,15,783
Total discharges: 44,07,818
Death toll: 75,849 pic.twitter.com/GhZshuOvMp
सध्या राज्यात ३६,९६,८९६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६,९३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण ६ लाख १५ हजार ७८३ सक्रीय रुग्ण आहेत.