maharashtra post office annonces vacancy do apply like this | खूशखबर! पोस्टात 3650 पदांसाठी भरती, दहावी पास तरुणांना नोकरीची संधी

खूशखबर! पोस्टात 3650 पदांसाठी भरती, दहावी पास तरुणांना नोकरीची संधी

ठळक मुद्देदहावी पास तरुणांना पोस्टात नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये एकूण 3650 जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे.ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर, आणि ग्रामीण डाक सेवक पदांसाठी ही भरती होत आहे.

मुंबई - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. दहावी पास तरुणांना पोस्टात नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये एकूण 3650 जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर, आणि ग्रामीण डाक सेवक पदांसाठी ही भरती होत आहे. दहावी पास अशी अट या भरती प्रकियेसाठी असून 30 नोव्हेंबर 2019 ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

एक नोव्हेंबरपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवातही झाली आहे. मात्र यासाठी दहावी पास असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तसेच अर्जदार उमेदवाराचं वय 14 ते 40 वर्षांदरम्यान असावं. अर्जदाराने बेसिक संगणक कोर्स केलेला असणं आणि अर्जदाराला स्थानिक भाषा येणं गरजेचं आहे. एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत पाच वर्षांपर्यंत वयाची अट शिथिल करण्यात आली आहे. तर, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठीही 3 वर्षांपर्यंत वयाची अट शिथिल आहे. नवी मुंबई, सोलापूर, पुणे, अहमदनगर, ठाणे या ठिकाणांवर 3650 जागांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे.

महाराष्ट्रातील 3650 जागांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. तरुणांना अर्ज करायचा असल्यास  indiapost.gov.in आणि appost.in/gdsonline संकेतस्थळाला भेट द्या. या लिंकवर क्लिक करून रजिस्टर करा आणि त्यानंतर तरुणांना अर्ज करता येईल. सर्वसाधारण प्रवर्ग, इतर मागासवर्गीय प्रवर्ग आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा फी 100 रुपये आहे.  तर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा फी द्यावी लागणार नाही. अर्जदार दहावी पास असवा तो जरी जास्त शिकलेला असला तरी दहावीच्या गुणांवर आधारितच ही भरती प्रक्रिया होणार आहे. 

post office rd recurring deposit account get double interest from bank saving know all about | पोस्टात फक्त 10 रुपयांत उघडा खातं; SBIहून मिळतो दुप्पट फायदा

पोस्टात फक्त 10 रुपयांत उघडा खातं; SBIहून मिळतो दुप्पट फायदा

पोस्ट ऑफिसमधलं रेकरिंग डिपॉझिट अकाऊंटवर भारतीय स्टेट बँकेच्या खात्याहून जास्त व्याज मिळत आहे. विशेष म्हणजे हे खातं तुम्ही 10 रुपयांची गुंतवणूक करून सुरू करू शकता. एसबीआय बचत खात्यावर 3.50 टक्के व्याज देते. तर पोस्टाच्या आरडीवर 7.2 टक्के वार्षिक व्याज मिळतं. एसबीआयहून दुप्पट व्याज पोस्टातल्या आरडीवर  मिळतं. पोस्टात आरडी उघडणंही तसं सोपं आहे. पोस्ट ऑफिसनं ग्राहकांना काही अशा छोट्या छोट्या उपलब्ध करून दिल्यात ज्यात तुम्ही मोठा फायदा मिळवू शकता. पोस्ट ऑफिस आपल्याला जीवन विमा संरक्षणसारख्या सुविधा पुरवते. तसेच पोस्टातील कर्मचारी हे सरकारचं एक माध्यम म्हणून काम करतात. यात वयोवृद्धांना पेन्शन पेमेंट योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचाही लाभ दिला जातो.  

 

Web Title: maharashtra post office annonces vacancy do apply like this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.